भाजपच्या माजी आमदाराने केला बंदूक दाखवून सुनेवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019
  • त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. असा थेट आरोप भाजपचे माजी आमदार मनोज शौकीन यांच्याविरोधात त्यांच्याच सुनेने केला आहे.
  • नांगलोई विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडून आलेल्या शौकीन यांच्याविरोधात कलम ३७६ आणि ५०६ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 
  • त्यांनी बंदूक काढून माझ्यावर उजारली आणि माझ्या कानशिलात लगावली.

नवी दिल्ली: ३१ डिसेंबर २०१८ ला निरोप आणि १ जानेवारी २०१9 नविन वर्षाचं स्वागत करण्यासाठी माझ्या नातेवाईकांनी  पश्चिम विहार येथील हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. पार्टी संपल्यानंतर मी, पती, भाऊ आणि चुलत भाऊ रात्री उशीरा घरी पोहचलो. माझे पती मित्रासोबत बाहेर निघून गेले आणि मी बेडरुम मध्ये झोपायला गेले. रात्री १. ३० दरम्यान माझे सासरे रुमचा दरवाजा खोलण्यासाठी आवाज दिला. 'तुला काही महत्त्वाच सागायचं आहे दरावाजा उघड' अस म्हणाले. 

मी दरवाजा उघडला, त्यांनी नकोत्या ठिकाणी हात लावण्यास सुरवात केली. ते मद्य प्राशन करुन होते. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बंदूक काढून माझ्यावर उजारली आणि माझ्या कानशिलात लगावली. मी आरडाओरडा करण्यास सुरु केली त्यावेळी त्यांनी मला व माझ्या भावाला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. असा थेट आरोप भाजपचे माजी आमदार मनोज शौकीन यांच्याविरोधात त्यांच्याच सुनेने केला आहे. याप्रकरणी त्यांच्या सुनेने गुरुवारी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर नांगलोई विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडून आलेल्या शौकीन यांच्याविरोधात कलम ३७६ आणि ५०६ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 

'प्रथम माझं लग्न टिकविण्यासाठी आणि भावाला वाचविण्यासाठी मी त्यांची पोलिसात तक्रार दिली नाही. याच वर्षी सात जुलैला सीए़डब्ल्यू सेलमध्ये माझ्या आई आणि वडिलांचा छळ करण्यात आला होता. याप्रकरणी साकेत पोलीस स्थानकात एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बुधवारी मी जेव्हा घरगुती हिंसाचार प्रकरणी साकेत कोर्टात गेली आणि माझी साक्ष देण्यासाठी प्रोटेक्शन अधिकाऱ्याला भेटली तेव्हा संबंधित प्रोटेक्शन अधिकाऱ्याने मला आणि माझ्या कुटुंबीयांना सुरक्षेची हमी दिली. त्यानंतर मी माझ्यासोबत झालेल्या अत्याचाराबाबत माहिती अधिकारी आणि कुटुंबीयांना सांगितली आणि पोलिसात तक्रार दाखल केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News