विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; ‘अभाविप’ची मागणी

सकाळ (यिनबझ)
Friday, 8 November 2019

नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, एसटी बस पास मोफत द्यावेत, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवासी नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मालेगाव : शहरासह कसमादे परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम उद्‌ध्वस्त झाला. शेतकऱ्यांना या वर्षी ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, एसटी बस पास मोफत द्यावेत, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवासी नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अतिवृष्टीमुळे पिके पूर्ण उद्‌ध्वस्त झाली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या स्थितीत मुलांचे शैक्षणिक शुल्क कसे भरावे, असा प्रश्‍न पालकांसमोर आहे. यावर उपाय म्हणून सर्व विद्याथ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. शिक्षणात खंड पडू नये याकरिता ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास द्यावा. महाविद्यालयातर्फे कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची सक्ती करू नये, तसेच सर्व महाविद्यालयांना तातडीने आदेश द्यावेत. वसतिगृहाचे शुल्क माफ करावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मालेगाव शहरमंत्री कामेश गायकवाड, जिल्हा समिती सदस्य गणेश हलवर, संदीप गवळी, शुभांगी पवार, विलास देवरे, भूषण भामरे, आकाश दुकळे, गजानन काळे, जीवन देवरे, वैभव बछाव, सचिन गवळी, शिवदास सूर्यवंशी, जयेश देशमुख, मयूर हलवर आदींनी केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News