महाविद्यालयीन निवडणुकीत चरित्र्य प्रमाणपत्राची सक्ती करा: अंकुश गावंडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • बंद पडलेल्या महाविद्यालयीन खुल्या निवडणुका अखेर सुरू
  • विद्यार्थी संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
  • काही वर्षांपूर्वी  महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती पसरली

अकोला: गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेल्या महाविद्यालयीन खुल्या निवडणुका अखेर सुरू झाल्या. या निवडणुकांच्या माध्यमातून पुर्वी अनेक नेते उदयास आले होते. यामुळे या महाविद्यालयीन निवडणुकांना मोठे महत्व दिले जाते. यामुळे अनेक विद्यार्थी तसेच विद्यार्थी संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.  काही वर्षांपूर्वी  महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती पसरली होती.

यांमध्ये अपहरण, खुन असे प्रकार वाढले होते. त्यामुळे या निवडणुकांवर बंदी घालण्यात आली होती. आता निवडणुकांवरील बंदी हटवून पुन्हा खुल्या निवडणुका सुरू होत असतांना पुन्हा गुन्हेगारी प्रकार घडू नये, यासाठी विद्यार्थी उमेदवारांचे चरित्र्य प्रमाणपत्राची सक्ती करा असे मागणी काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अंकुश गावंडे यांनी राज्यपालांकडे निवेदना मार्फत केली.

नियम व अटीमध्ये बसल्यास मी सुद्धा उमेदवार

नियम व अटींच्या चौकटीत बसल्यास मी सुद्धा उमेदवार असल्याचे अंकुश अनिल गावंडे यांनी सांगितले अंकुश अनिल गावंडे हे उच्चशिक्षित असुन ते विधी महाविद्यालय अकोला येथे शिक्षण घेत आहेत. लॉच्या विद्यार्थींच्या पुर्ण:परीक्षा तसेच इंजिनीयरींगच्या पेपरफुटी प्रकरण निकाली लावुन अनेक विद्यार्थांना न्याय मिळवून दिला आहे. अकोला विधी महाविद्यालय अकोला येथुन अध्यक्ष पदासाठी ते उमेदवारी लाढवतील असे त्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News