या फुटबॉलस्टारने दिल्या विराटच्या टीम इंडियाला शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • विराटच्या टीम इंडियाला शुभेच्छा
     

म्युनिक - विराट कोहलीची सेना उद्यापासून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची मोहीम सुरू करत आहे. केवळ भारतातूनच नव्हे; तर परदेशात स्थायिक असलेल्या भारतीयांचा पाठिंबा टीम इंडियाला मिळणार आहे; पण जर्मनी फुटबॉल संघाचा स्टार थॉमस मुल्लेरनेही विराट आणि टीम इंडियाला सलामीच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  

मुल्लेरने आपल्या ट्विटरवर विराटच्या नावाची जर्सी परिधान केलेला, खांद्यावर बॅट घेतलेला आणि थम्पअप करणारे स्वतःचे छायाचित्र पोस्ट केले आहे. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत विराट कोहली जर्मनी संघाचा पाठिराखा होता. हीच जाणीव कायम ठेवत मुल्लेर आता विराटच्या पाठीशी उभा राहिला आहे. ‘गुड लक इंडिया’ अशा आशयाचे हे ट्विट मुल्लेरने केले आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News