तपासणीसह प्रात्यक्षिकेवर भर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात पुस्तकी ज्ञानातून ओळख दिली जात होती.

जळगाव - वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात पुस्तकी ज्ञानातून ओळख दिली जात होती. प्रत्यक्ष रुग्णाची तपासणी किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दुसऱ्या वर्षातील प्रवेशानंतरच संधी मिळत होती. परंतु, या वर्षापासून ‘वैद्यकीय’च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, प्रवेश घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांना रुग्णांशी संवाद साधून त्यांची तपासणी करता येणार आहे. हा निर्णय सर्व शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी लागू केला आहे.

वैद्यकीय शिक्षणाचे प्रवेश व अभ्यासक्रमाची रचना ठरविण्याचे काम मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय)मार्फत करण्यात येत होती. मात्र, वैद्यकीय शिक्षणाच्या ‘गव्हर्निंग’मध्ये बदल होऊन ‘बोर्ड ऑफ गव्हर्नमेंट’ची (बीओजी) स्थापना करण्यात आली आहे. अधिकारात बदल झाल्याबरोबर ‘बीओजी’ने एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सर्वांसाठी आरोग्य’ हे आपल्यासाठी महत्त्वाचे मानून सामाजिक दायित्व कळावे, या उद्देशाने अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

पाच उद्दिष्टांसाठी बदल
‘बीओजी’ने एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात यंदापासून बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रमातील केलेला बदल हा पाच उद्दिष्टांसाठी केला आहे. यात प्रामुख्याने प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्स; यात ज्ञान आणि ‘कम्युनिकेशन स्किल’ शिकविले जाणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News