तब्बल पाच हजार गीते मुखोद्गत असलेला बासरी वादक; पहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • अंद्ध असला करी अंगी असलेल्या बासरी वाजवण्याच्या कलेमुळे साठ वर्षे वृद्धाने अकोलेकरांना चांगलीच भुरळ घातली आहे.
  • रिसोड तालुक्यातील पळसखेडा या गावातील बाजीराव गोविंद फड हे साठ वर्षे वृद्ध जन्मताच डोळ्यांनी अंध आहेत

अकोला : वय वर्ष साठ आणि त्यातही अंध असे जरी असले तरी अंगी असलेल्या बासरी वाजवण्याच्या कलेमुळे साठ वर्षे वृद्धाने अकोलेकरांना चांगलीच भुरळ घातली आहे. शहरातील रस्त्यांवर बासरी वाजवत फिरणाऱ्या या वृद्धाच्या बासरीचा सुमधुर आवाज ऐकून संगीतप्रेमी गोळा होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

रिसोड तालुक्यातील पळसखेडा या गावातील बाजीराव गोविंद फड हे साठ वर्षे वृद्ध जन्मताच डोळ्यांनी अंध आहेत. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने संसाराचा गाडा हाकणाऱ्या बाजीराव फड यांच्या अंगी मात्र बासरी वाजवण्याची वेगळीच कला आहे.

तब्बल पाच हजार हिंदी आणि मराठी गीते मुखोद्गत असलेल्या फड यांच्या बासरीच्या सुमधुर आवाजातून ते बाहेर पडत आहेत विशेष म्हणजे रिसोड ते अकोला असा रोजचा प्रवास करून अकोल्यातील रस्त्यांवर बासरी वाजवून अकोलेकरांचे लक्ष वेधून घेत आहे मुलगा आहे मुलगी आहे घरी सर्व काही आलबेल असताना.

निव्वळ आणि निव्वळ  आपल्या अंगी असलेल्या कलेला दाद मिळावी म्हणून हे वृद्ध बासरी वाजवत अकोलेकरांचे मनोरंजन करत आहे असे जरी असले तरी कोणाच्या दुकानावर कुणाच्या मागे लागून पैसे गोळा ते करत नाहीत ज्यांना आवडले ते स्वतःहून येऊन त्यांना शक्य तेवढी मदत करताना दिसून येतात. संपर्क क्रमांकही करतात सेव्ह बाजीराव फड यांना दिसत जरी नसले तरी ते आपल्याजवळ असलेल्या मोबाईल मध्ये नंबर सेव्ह करतात. बासरी वाजवणे आणि मोबाईल हाताळणे याचे प्रशिक्षण मुंबई येथे मिळाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News