पुराच्या पाण्यात युवक गेला वाहून

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 3 August 2019
  • धीरज याची पाण्यात पोहताना दमछाक झाली, व तो पुराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला इतर युवकांनी ही त्याला वाचवन्याचा प्रयत्न केला मात्र ते त्याला वाचवू शकले नाहीत.

सातारा : मर्ढे ता. सातारा  येथील धीरज तुकाराम शिगटे वय 19 हा युवक गावातील युवकांबरोबर सकाळी 11 वाजता पुराच्या पाण्यात पोहायला गेला होता. कृष्णा नदीवर असणाऱ्या आनेवाडी व मर्ढे पुलावरुन या युवकाने नदीच्या पुरामध्ये उड्या घेतल्या त्यावेळी सर्वजण पोहत असताना धीरज याची पाण्यात पोहताना दमछाक झाली.

तो पुराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. इतर युवकांनी ही त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्याला वाचवू शकले नाहीत. बेपत्ता झालेल्या धीरजला शोधण्यासाठी येथील गावातील शेकडो ग्रामस्थ नदिकाठी असणाऱ्या गावाच्या काठावर शोध घेत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News