मुंबईत फ्लेमिंगोंचा मुक्काम वाढला 

- अविनाश भगत
Thursday, 6 June 2019

खाद्यान्नासह पोषक वातावरण कारणीभूत असल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष सायबेरिया व कच्छवरून येणारे हे फ्लेमिंगो पक्षी हिवाळ्यात थव्याथव्याने येतात. एप्रिल-मेपर्यंत ते इथून स्थलांतर करतात. सध्याचे वातावरण पाहता पाऊस लांबणीवर पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे जून, जुलैपर्यंत येथील वातावरण पोषक असल्याने ते अजून अधिक काळ असतील. - अविनाश भगत पक्षी अभ्यासक, ठाणे 

कोपरखैरणे - वाशी सागरविहार येथील खाडीवर सध्या रोहित पक्षी ऊर्फ फ्लेमिंगोचे अद्यापही वास्तव्य असून जवळपास हजारोंच्या संख्येने हे पक्षी दाखल झालेले आहेत. तब्बल दोन-अडीच महिन्यांच्या काळानंतर हजारो किलोमीटरचा प्रवास करून रोहित पक्षी खाद्याच्या शोधात पाणथळ भागात येतात. येथील मुबलक खाद्य आणि पोषक वातावरणामुळे फ्लेमिंगोंचा मुक्काम वाढल्याचे मत पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 
थंडीची चाहूल लागली की, ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्‍ये हे पक्षी जलाशयावर दाखल होतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News