जयसिंगपूरात ‘घोडावत’च्या १० विद्यार्थ्यांचा यशाचा झेंडा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

जेईई, सीईटी, एम्स व नीट या स्पर्धा परीक्षांमध्ये उच्चांकी निकालाची परंपरा जपणारी संजय घोडावत आय.आय. टी. व मेडिकल ॲकॅडमीच्या दहा विद्यार्थ्यांनी सीईटी-२०१९ परीक्षेत ९९ टक्‍क्‍यांवर गुण मिळवून यश संपादन केले.

जयसिंगपूर - जेईई, सीईटी, एम्स व नीट या स्पर्धा परीक्षांमध्ये उच्चांकी निकालाची परंपरा जपणारी संजय घोडावत आय.आय. टी. व मेडिकल ॲकॅडमीच्या दहा विद्यार्थ्यांनी सीईटी-२०१९ परीक्षेत ९९ टक्‍क्‍यांवर गुण मिळवून यश संपादन केले. ॲकॅडमीच्या शशांक ऐताल या विद्यार्थ्याने ९९.९८ टक्के पश्‍चिम महाराष्ट्रात उच्चांकी गुण प्राप्त केले.

स्टीवन अँटीन- ९९.९८, श्रीयस कुलकर्णी- ९९.९८, निशांत बिराजदार- ९९.९७, श्रीरंग रायरीकर-९९.९६, श्रेया बागडे- ९९.९५, सौरव कलसूर-९९.९४, श्रीशैल आगाशे-९९.९३, सायली पाटील-९९.९२, सर्वेश फेगडे-९९.९० गुण मिळवले. याचबरोबर ९९.५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे ४० विद्यार्थी, ९९ टक्‍क्‍यांवर ५७ विद्यार्थी, ९८ टक्‍क्‍यांवर १०३ विद्यार्थी, ९७ टक्‍क्‍यांवर १३३ विद्यार्थी, ९६ टक्‍क्‍यांवर १७५ विद्यार्थी, ९५ टक्‍क्‍यांवर २०३ विद्यार्थ्यांनी संस्थेचे नाव उज्ज्वल केले. 

यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, उद्योगपती संजय घोडावत यांनी ॲकॅडमीचे संचालक श्री. वासू व त्यांच्या सहकाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘वर्षानुवर्ष उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखत ॲकॅडमीने यशाची घोडदौड सुरू ठेवली आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. श्री. वासू यांच्यावर ॲकॅडमीची जबाबदारी टाकली. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विश्‍वास सार्थ करून दाखविला. ॲकॅडमी दरवर्षी निकालाचा आलेख उंचावत आहे, ही गौरवास्पद बाब आहे.’

वासू म्हणाले, ‘प्रयत्नांची उंची वाढवली की, यशाचे शिखरही छोटे वाटू लागते. या वर्षीचा सीईटीचा निकाल त्याचे फलित आहे. सलग तीन वर्षे ॲकॅडमीचे विद्यार्थी राज्यात तिसऱ्या स्थानावर आहेत. यापुढेही ॲकॅडमीची यशस्वी वाटचाल चालू राहील.’ विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनीही यशस्वी विद्यार्थी, पालक, संचालक श्री. वासू व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News