नक्षली हल्ल्यात पाच पोलिस शहीद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019
  • झारखंडमध्ये गस्ती पथकावर गोळीबार
  • काही पोलिस जखमी

जमशेदपूर : झारखंडच्या सराईकेला जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी शुक्रवारी सायंकाळी केलेल्या हल्ल्यात पाच पोलिस शहीद झाले. त्यात दोन फौजदार आणि तीन जवान आहेत. सराईकेला जिल्ह्यातील कुकडू बाजार या गावात पोलिसांची गस्त सुरू असताना हा हल्ला झाला. दोन नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला, तसेच, हल्ल्यानंतर त्यांनी पोलिसांची शस्त्रे पळवली असून हल्ल्यात काही पोलिस जखमी झाल्याचे वृत्त आहे.

हल्ला झालेले ठिकाण पश्‍चिम बंगाल-झारखंड सीमेलगत आहे. या हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री रघुवर दास यांनी दुःख व्यक्त केले. नक्षलवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. महिनाभरात नक्षलवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे. तालडांगलच्या जंगलात चममकीत एक जवान हुतात्मा झाला होता, तर चौघे जखमी झाले होते.

छत्तीसगडमध्ये दोन नक्षलवादी ठार
रायपूर : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीमध्ये दोन नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. मालेपारा आणि मुरनार खेड्यादरम्यानच्या जंगलामध्ये शुक्रवारी मध्यरात्री ही चकमक झाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News