उद्धव ठाकरेंच्या आज सोलापूर जिल्ह्यात पाच सभा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 October 2019
  • जिल्ह्यात महायुतीच्या प्रचाराचा झंझावात सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत.

सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ते सभा घेणार आहेत. जिल्ह्यात महायुतीच्या प्रचाराचा झंझावात सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत.

बार्शीमध्ये जुना गांधी पुतळा येथे दिलीप सोपल यांच्यासाठी दुपारी एक वाजता सभा होईल. करमाळ्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर रश्‍मी बागल यांच्यासाठी दुपारी अडीच वाजता सभा होणार आहे. सायंकाळी चार वाजता शहाजी पाटील यांच्यासाठी सांगोल्यात हर्षदा लॉनसमोर, मोहोळमध्ये नागनाथ क्षीरसागर यांच्यासाठी सायंकाळी पाच वाजता, दिलीप माने यांच्यासाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात कर्णिकनगर येथे रात्री आठ वाजता सभा आयोजित केली आहे.

सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत उद्धव ठाकरे उस्मानाबादमध्ये सभा घेणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News