अबब! देशात पोलिसांची एवढे लाख पदं रिकामी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019

नवी दिल्ली :  देशाची लोकसंख्या पाहता प्रत्येक राज्यात आणि शहरात पोलिसांचे संख्या बळ कमी पडते. देशात सद्यस्थितीतला २४ लाख ८४ हजार १७० पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे. पण केवळ १९  लाख ४१ हजार ४७३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या जागा भरणे अवश्यक आहे. ही माहिती डेटा ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटने संकलित केली आहे. या माहितीनुसार १ जानेवारी २०१८ रोजीनुसार देशात पोलिसांची एकूण ५.४३ लाख पदं रिकामी आहेत. 

नागालँड देशातील एकमेव राज्य आहे. जिथे २१ हजार २९२ पदं आहेत. पण येथे ९४१ पोलीस कर्मचारी अधिक आहेत. देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशात ४ लाख १४ हजार ४९२ पदं आहेत. पण यामधील १ लाख २८  हजार ९५२ पदं रिकामी आहेत. बिहारमध्ये १ लाख २८ हजार २८६ पदं आहेत. पण ७७ हजार ९९५ पदं भरलेली आहेत.  पश्चिम बंगालमध्ये १ लाख ४० हजार ९०४ पोलीस कर्मचाऱ्यांची गरज आहे. पण येथे ४८ हजार ९८१ पदं रिकामी आहेत.

देशाची राजधानी दिल्लीतही अशीच परिस्थिती आहे. दिल्लीतील पोलीस दलात ११ हजार ८१९ पदं रिकामी आहेत. दिल्ली, आंध्र प्रदेश, झारखंड, हरियाणा, तेलंगाना, केरळ आणि ओडिशासारख्या राज्यातही अशीच परिस्थिती आहे. नक्षलग्रस्त प्रभाग छत्तीसगढमध्येही ११ हजार ९१६ पदं रिकामी आहेत. दहशतवाद्यांनी त्रस्त असलेले राज्य जम्मू-काश्मिरमध्येही १० हजार ०४४ पदं रिकामी आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News