विद्युतने दिल्या फिटनेसच्या टिप्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019

फिटनेसबाबत जागरुक असणाऱ्या विद्युतने नुकतेच मुंबईत सुनिता अग्रवाल यांच्या पिलेट्‌स स्टुडिओचे लाँचिंग केले. पिलेट्‌स म्हणजे शरीर फिट राहण्यासाठी केले जाणारे विविध वर्कआऊट. विद्युतने या स्टुडिओच्या लाँचिंगदरम्यान वर्कआऊटचे विविध प्रकार करत उपस्थितांना फिटनेस फंडेही सांगितले.

अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या सोशल मीडियावरून सतत वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा ‘जंगली’ चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील त्याचा सिक्‍स पॅक ॲब्स लूक विशेष लक्षवेधी ठरला.

फिटनेसबाबत जागरुक असणाऱ्या विद्युतने नुकतेच मुंबईत सुनिता अग्रवाल यांच्या पिलेट्‌स स्टुडिओचे लाँचिंग केले. पिलेट्‌स म्हणजे शरीर फिट राहण्यासाठी केले जाणारे विविध वर्कआऊट. विद्युतने या स्टुडिओच्या लाँचिंगदरम्यान वर्कआऊटचे विविध प्रकार करत उपस्थितांना फिटनेस फंडेही सांगितले.

‘शरीर फिट ठेवायचे असेल, तर नेहमी वर्कआऊट, व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामामध्ये सातत्य ठेवल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते.’ असे विद्युतने सांगितले. विद्युत सतत देत असलेल्या फिटनेस टिप्स त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणाऱ्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News