लग्न करू नका आणि दीर्घायुषी व्हा; अमेरिकेतल्या 107 वर्षांच्या आजीबाईंचा नवा मंत्र

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Friday, 2 August 2019

लग्नाच्या बेडीत अडकले नाही म्हणून आयुष्याची १०७ वर्ष गाठू शकले असं म्हटल्याने ही आजी रातोरात स्टारच झालीय.  

लुईस सिग्नोर या कोणी सेलिब्रिटी नाहीयत. त्या आहेत अमेरिकेतल्या १०७ वर्षांच्या आजीबाई. पण, त्यांच्या एका वाक्यानेच त्यांना फेमस केलंय. 

नुकताच त्यांनी त्यांचा 107 वा वाढदिवस साजरा केला, त्यासाठी कूप सिटीतल्या बार्टो कम्युनिटी सेंटरमध्ये एक पार्टीं ठेवली होती. त्यावेळी एका चॅनेलने घेतलेल्या मुलाखतीत आजीने तिच्या दीर्घायुष्याचं रहस्य उघड केलं.

आजीने म्हटलंय की...

मी इतरांप्रमाणे व्यायाम करते, थोडाफार डान्सही करते. जेवण झाल्यावर ‘बिंगो’ तर आवर्जून खेळते... पण मी अजून लग्नच केलं नाहीय... मी अजूनही सिंगल आहे... मला असं वाटतं की लग्न न करणं हेच माझ्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य असावं... लग्न केलं नसतं तर किती बरं झालं असतं, असं माझ्या बहिणीने मला अनेकदा म्हटलंय...

विशेष म्हणजे आजीने त्यांच्या ज्या बहिणीचा उल्लेख केलाय, तिचं लग्न झालंय आणि तिनेही वयाची १०२ वर्ष पूर्ण केलीयत..

महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेतल्या ११४ वर्षांच्या एलेलिया मर्फी यांना सर्वात वृद्ध महिला म्हणून ओळखलं जातं. मर्फी या न्यू-यॉर्कच्या हार्लेम या भागात राहतात. तिथेच सिग्नोर या आजींचाही जन्म झाला.

आजीने आपल्या दीर्घायुष्याचं अजब रहस्य सांगून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.. पण या सगळ्यावर डॉक्टरांचं काय म्हणणंय ते पाहा.

ही आजीबाई जर भारतात जन्माला आली असती तर लग्नाची बेडी तिला टाळता आली असती का हा प्रश्न जरी असला तरी अनेक जोडपी अशी आहेत ज्यांनी लग्नानंतरही शंभरी पार केलेली आहे.

त्यामुळे आता सिग्नोर आजींचं ऐकून लग्न करायचं की नाही हा निर्णय अर्थातच तुमच्या हाती असणारेय. त्यामुळे हेल्दी खा, लाईफ एन्जॉय करा, स्वस्थ रहा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News