मलेशियाहून मुंबईला पहिली वेळ आलेली महिला मुंबईच्या पहिल्या पावसात थोडक्यात बचावली

सुरज पाटील (यिनबझ)
Friday, 28 June 2019

गेले काही दिवस महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे, तर दोन दिवसापासून मुंबईतही या मान्सूनने हजेरी लावली आहे. दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी पहिल्या पावसात मुंबईच्या रस्त्यांवर पाणी तुंबण्याचा विक्रम झाला.

मुंबई - गेले काही दिवस महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे, तर दोन दिवसापासून मुंबईतही या मान्सूनने हजेरी लावली आहे. दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी पहिल्या पावसात मुंबईच्या रस्त्यांवर पाणी तुंबण्याचा विक्रम झाला. पहिल्या पावसात मुंबईत तीन बळी गेले, मात्र या व्यतिरिक्त भारत देश पाहाण्यासाठी पहिली वेळ आलेल्या मलेशियाच्या एका महिलेचा देखील अशाप्रकारे जीव जाता-जाता वाचला आहे. 

मुंबईत पाऊस आला की सगळ्यात आधी पाणी तुंबते ते म्हणजे मुंबईचे दाटीवाटीचे ठिकाण असलेल्या अंधेरीमधल्या मिलान सबवेवर. याच सबवेवर भरलेल्या पाण्यामुळे एक मलेशियाहून आलेली महिला फसली होती, मात्र तिथल्या जागरूक नागरिकांनी तीला वाचवले.

आज (शुक्रवारी) झालेल्या पावसामुळे मुंबईच्या अनेक ठिकाणांना वॉटरपार्कचे स्वरूप आले होते. अंधेरी, वर्सोवा, नरिमन पॉईंट, पालघर आणि इतर ठिकाणी मुंबईची तुंबई झाली होती. या पहिल्याच पावसाने तिघांचे बळी घेतले, तर या महिलेचा जीव जाता-जाता वाचला, त्यामुळे मुंबईच्या पावसाची सुरूवात होण्याआधीच पावसाचे बळी जाण्यास सुरूवात झाले हे नक्की, त्यामुळे प्रवासाच्या दरम्यान आपली काळजी घ्या, इतकेच आवाहन यिनबझकडून.

नवी मुंबई - सीबीडी-बेलापूर डेपो आणि सिडको वसाहती मधील रस्त्यावर पाणीच पाणी.. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News