भारतात पहिली वेळ, पोलिसांनी बलात्काऱ्याला घातल्या गोळ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019

देशात बलात्कारांचे प्रमाण वाढले असता, उत्तर प्रदेशात बलात्काऱ्याला थेट गोळ्या घालण्याचा प्रकार घडला आहे.

रामपूर - देशात बलात्कारांचे प्रमाण वाढले असता, उत्तर प्रदेशात बलात्काऱ्याला थेट गोळ्या घालण्याचा प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशमधील रामपूर या ठिकाणी 7 मे रोजी बलात्काराची धक्कादायक घटना घडली होती.

6 महिन्याच्या एका चिमुरडीचे अपहरण करून, तिच्यावर बलात्कार झाल्यावर तिची हत्या करून आरोपी नाजिल फरार झाला होता. तब्बल एक महिन्याने रामपूरचे एसपी अजयपाल शर्मा यांनी त्याला पकडून थेट गोळ्या घातल्या. सध्या तो जिल्हा रुग्णालयात दाखल असून त्यावर उपचार सुरू आहेत. 

मागील दिड महिन्यापासून सिव्शहील लाईन पोलीस फरारी आरोपी नाजिल याच्या शोधात होते. चिमुरडीचा मृतदेह सापडल्याने तेथील पोलिसांवर मोठ्याप्रमाणात टीका केली जात होती. यासगळ्याकडे दुर्लक्ष करत पोलीस पथकाने आपला शोध कायम ठेवला आणि शेवटी पोलिसांना नराधमाला पकडण्यात यश आले. संपूर्ण देशभरातून एसपी अजयपाल शर्मा यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News