video: ४४ वर्षात पहिल्यांदाच धरणातून पाणी सोडले; अनेकांचे संसार उध्वस्त झाले

मिलिंद देसाई
Wednesday, 14 August 2019
  • 44 वर्षात एकदाही धरणातून पावसाळ्यात मोठया प्रमाणात पाणी सोडण्याची वेळ आली नाही.
  • मात्र बेळगाव खानापूर व इतर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरण 100 टक्के भरले त्यामुळे गेल्या आठ दिवसात धरणातून प्रचंड पाणी सोडण्यात आले.

बेळगाव: कमी पाऊस आणि सातत्याने दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या सौंदत्ती, रामदुर्ग तालुक्यातील जनतेला नवलतीर्थ धरणातून पहिल्यांदाच सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे  पुराला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे लोकांच्यात अजूनही भीतीचे वातावरण असून घरांची प्रचंड प्रमाणात पडझड झाली असून वीज खांब आणि ट्रान्सफॉर्मर पडल्याने या भागातील वीज पुरवठा अध्यापही सुरळीत झालेला नाही. खानापूर तालुक्यात उगम पावलेल्या मलप्रभा धरणावर 1974 साली सोंदत्ती जवळ नवलतीर्थ उभारण्यात आले.

 त्यानंतर 44 वर्षात एकदाही धरणातून पावसाळ्यात मोठया प्रमाणात पाणी सोडण्याची वेळ आली नाही. त्यामुळे सोंदत्ती परिसरातील एकाही गावाला कधीही पुराचा सामना करावा लागला नाही. मात्र बेळगाव खानापूर व इतर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरण 100 टक्के भरले त्यामुळे गेल्या आठ दिवसात धरणातून प्रचंड पाणी सोडण्यात आले. तर मंगळवारी रात्री 3 च्या सुमारास एक लाख 25 हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आल्यानंतर येथील नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली, ती पावसाचा जोर ओसरल्यानंतरही कमी झालेली नाही.

 मुन्नोळी गावातील नदी काठाची सर्व दुकाने पुरात वाहून गेली आहेत. तसेच वीज खांब तुटून पडले आहेत. तसेच संपूर्ण संपूर्ण हेस्कॉमचे सब स्टेशन पूर्णपणे बाद झाले आहे. त्यामुळे 50 हुन अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित झाली असून अजून 8 ते 10 दिवस वीज पुरवठा येणार नाही असे हेस्कॉमतर्फे स्पष्ट करण्यात आले होते.  

धरण भरणार असल्याची माहिती देण्यात आली होती मात्र रात्री अचानक पाणी सोडण्यात आल्याने घरातून बाहेर पडताना प्रचंड त्रास सहन करावा लागला कधीही मोठया प्रमाणात पाऊस पडत नाही परंतु धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागला आहे   
-शैलजा कदम, रहिवासी मुन्नोळी
  

                         

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News