एमबीए प्रवेशासाठी १३ जुलैपासून पहिली फेरी होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

नागपूर -राज्याच्या सामायिक परीक्षा कक्षातर्फे एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३० जूनपासून ऑनलाइन नोंदणीस सुरुवात करण्यात आली. एमबीए प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीमध्ये एक लाख दोन हजार ८५१ विद्यार्थी पात्र ठरले. प्रत्यक्षात सात जुलैपर्यंत केवळ ५० हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. ही नोंदणी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत निम्मे असल्याने महाविद्यालयांचे टेंशन वाढले आहे.

मागील वर्षीपासून एमबीए अभ्यासक्रमाची क्रेझ वाढली. एमबीए प्रवेशासाठी घेतलेल्या सीईटीसाठी १० जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले होते. राज्यभरातील ३५ हजारांवर जागांसाठी एक लाख ११ हजार ८४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी एक लाख तीन हजार ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. विभागात ५० महाविद्यालयांमध्ये चार हजार जागा असून, जवळपास १० ते १२ हजारांवर विद्यार्थी सीईटीला बसले होते. त्यासाठी सहा हजार ८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

३० जूनपासून एमबीए नोंदणीला सुरुवात झाली. प्रवेशासाठी चार जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास सुरुवात झाली. मात्र, नोंदणीसाठी चारच दिवस दिल्याने केवळ ४४ हजारांवर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदविले. यापूर्वी किमान १५ दिवस नोंदणीसाठी देण्यात येत होते, हे विशेष. आता नोंदणीला रविवारपर्यंत (ता. ७) मुदतवाढ दिली होती. सोमवारपर्यंत कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. सोमवारी रात्री प्रवेशाचे वेळापत्रक घोषित करण्यात आले. यात १३ जुलैपासून पहिल्या प्रवेश फेरीची सुरुवात होणार आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News