पहिल्या पाऊसाची मज्जा....        

स्नेहल पवार, सातारा
Monday, 22 July 2019
  • निसर्गाची पण काय कमाल आहे ना !
  • असा हा पाऊस कधीही न संपणारा असावा अस वाटत. त्याच्या येण्याने निसर्ग कसा हिरवी शाल पांघरून बसल्यासारख वाटतो  खूप मज्जा असते.

निसर्गाची पण काय कमाल आहे ना ! मन भारावून टाकणारे ऋतु आपल्याला अनुभवायला मिळतात अगदी मनसोक्त आणि खास करून आपल्याला जास्त आतुरता असलेला ऋतु म्हणजे पावसाळा कोणाला त्याची गरज असते म्हणून तर कोणाला त्याची आवड असते म्हणून,प्रेम भरल्या डोळ्यांनी अगदी चातकासारखी वाट पाहत असतो. आणि मीही अशीच त्याची वाट बघत होते आणि तो आला माझ्या आठवणीतील पहिला पाऊस अगदी चिंब पणे पूर्ण आसमंत त्याच्यात न्हावून निघाला . 

उन्हाने तापलेली धरती कशी पावन झाल्यासारखी भासू लागली. पावसाच्या त्या रिमझिम सरी अमृतासारख्या तिच्यावर बरसत होत्या आणि इंद्रधनुष्याचा सप्तरंगी गजरा तिच्या डोक्यात माळला होता. किती छान होते ना हे दृश्यमस्त

असा हा पाऊस कधीही न संपणारा असावा अस वाटत. त्याच्या येण्याने निसर्ग कसा हिरवी शाल पांघरून बसल्यासारख वाटतो  खूप मज्जा असते. असा वाटत की देवाने त्याच्या हातात जणू जादूची कांडीच दिली आहे. बघाना..माणूसच नाही तर अगदी किड्यामुंग्यापर्यंत सगळे कसे खूश असतात.

कोणाच्यातरी येण्याने इतका आनंद मिळत असेल तर ती खरंच जादूच आहे ना! ह्या जादुई दुनियेत जादूगारासारख जगायला शिकले पाहिजे..जरी प्रेमाचे चार शब्द बोलता आले नाही तरी वाईट शब्द कधीच उच्चारले नाही पाहिजेत.कोणाला हसवू शकलो नाही तरी किमान अश्रू पुसण्यासाठी हात पुढे आले पाहिजेत,आणि कस पूर्ण जीवन आनंदमय करून टाकले पाहिजे. अगदी ह्या पावसासारख कधी उनाड कधी स्वैर फिरणारं थोडासा रुसणारा पण खळखळून हसणारा.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News