विश्व कपमधील टीम इंडियाची अल्टनेटिव जर्सी पाहिली का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

क्रिकेट विश्वचषकाला  30 मे पासून सुरुवात झाली आहे. क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या इंग्लंडमध्ये यंदाचा विश्वचषक रंगत आहे. क्रिकेट विश्वचषकासाठी आयसीसीद्वारे काही नियम बदलण्यात आले आहे. वनडे क्रिकेटसाठी हे नियम लागू करण्यात आले असून त्याची सुरुवात वर्ल्ड कपपासून होत आहे.

ज्यामध्ये फॉर्मेटसह विश्वचषक स्पर्धेला अधिक आकर्षक करण्यासाठी फुटबॉल प्रमाणे  एका रंगाच्या जर्सी घालणाऱ्या संघासाठी अल्टरनेटिव जर्सीची योजना बनविली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अल्टरनेटिव जर्सीच्या योजने अंतर्गत जवळजवळ सर्व संघांनी काही दिवसांपूर्वी त्यांची दुसरी जर्सी रिलीझ केली. परंतु भारतीय क्रिकेट संघाच्या अल्टरनेटिव जर्सीची उत्सुकतेने चाहते वाट पाहत होते. भारतीय चाहत्यांमध्ये विराट कोहली आणि कंपनीची अल्टरनेटिव्ह जर्सी पाहण्यासाठी उत्सुकता होती.

त्यांची ही प्रतीक्षा रविवारी संपली जेव्हा भारतीय संघाची दुसरी जर्सी समोर आली. भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग तसा निळा आहे, परंतु ते विश्वचषक स्पर्धेतील काही सामन्यांमध्ये ऑरेंज रंगाची जर्सी घालतील.

आयएएनएसच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेसाठी जी अल्टरनेटिव जर्सी समोर आली आहे तीचा मागील बाजूस ऑरेंज रंग आहे, परंतु जर्सीच्या समोरचे दृश्याचा अद्याप खुलासा झालेला नाही, परंतु मागील दृश्यानुसार, तर ही पूर्ण ऑरेंज रंगाची जर्सी आहे. असे मानले जाते की आयसीसीच्या नवीन नियमांनुसार भारतीय संघ अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध या अल्टरनेटिव ऑरेंज रंगाची जर्सी वापरेल. परंतु जर स्त्रोतांनुसार भारतीय संघ बाहेर (अवे) सामन्यांत या जर्सीचा वापर करणार नाही जसा आयसीसीने होम एंड अवेसाठी जर्सीचा नियम बनविला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News