राज्यातली पहिली घटना; 'या' शेतकऱ्यांना मिळणार १०.६३ कोटी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019
  • धारशिवला संघटनेचा दणका... 
  • १०२१ ऊस शेतकऱ्यांना १८६४ एफआरपी आणि १५ टक्के व्याजाचे २९७.६० रुपये मिळून २१४३ रुपये प्रतीटन मिळणार
  • वसंत सहकारी साखर कारखाण्याकडून १०.६३ कोटी वसुल.
  • शरद जोशी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नाला यश.

नाशिक: पाच वर्षांपासुन राज्यातील अनेक सहकारी व खाजगी साखर कारखाण्यांनी ऊस शेतकऱ्यांना किफायतशिर मुल्य एफआरपी कधीच वेळेवर दिलेली नाही. एफआरपी व्याजासह मिळावी याबाबतची मागणी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने पाच वर्षांपासुन लावुन धरलेली आहे. शेतकऱ्यांची कारखाण्यातील मालमत्ता विकण्यापेक्षा चेअरमन, (अध्यक्ष) संचालक मंडळ, एमडींना जबाबदार धरुन थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह वसुल करावी म्हणून संघटनेने मुख्यमंत्री, मुख्यसचिव, सहकार सचिव, साखर आयुक्त यांचेकडे आग्रह धरलेला होता. 

धारशिव शुगर (वसंत सहकारी सा. का. देवळा, नाशिक) आरआरसी कारवाईला ऊशिर होतोय, साखर विकूनही शेतकऱ्यांना ऊसाचे बील मिळत नाही, म्हणून ऊसदर नियामक मंडळाचे सदस्य विठ्ठल पवार यांनी मुख्यमंत्री, मुख्यसचिव, सहकार सचीव, साखर आयुक्त यांच्याकडे संबधीतांवर दप्तर दिरंगाई, कर्तव्यात कसुर केला, म्हणून कारवाई करावी व धाराशिवचे अध्यक्ष, एमडींवर त्वरीत एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी १२ जून २०१९ रोजी केली होती. 

मुख्यसचिव अजोय मेहता या मागणीची दखल घेत तत्काळ सहकार सचिव, अव्वर सचिव यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर आठ दिवसात एफआरपी व्याजासह जमा करण्याचे पत्र स्पेशल अॉडीटर देशमुख यांनी विठ्ठल पवार यांना पाठविले. देवळा तहसिलदार यांनी स्टेट बँकेत शेतकऱ्यांच्या ऊस बीलाची रक्कम व्याजासह जमा केली आहे. असे विठ्ठल पवार यांना सांगण्यात आले. 

१०२१ पैकी ७०० शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर विना कपात १५ टक्के व्याजासह एफआरपी जमा कलेचे पत्र पाठवले आहे. विठ्ठल पवार यांनी नाशिकचे जिल्हाधितारी सुरज मांढरे, देवळा तहशिलदार दत्तात्रय सेजवळ, स्पेशलअॉडीटर देशमुख यांचे आभार मानले आहेत. राज्यात व्याजासह एफआरपी वसुल केल्याचा मान शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेला मिळाला आहे. 

संघटना कोणतीही राजकीय भूमीका न घेता केवळ शेतकरी, कष्टकरी, कामगार व सहकार यांचे हित जोपासन्याचे काम करत आहे. यापुढे मुख्यमंत्री, मुख्यसचीव, सहकारसचिव, साखर आयुक्त यांच्या मार्गदर्शनाने मागिल २२ हजार कोटींचे थकीत एफआरपी आणि मंत्र्यांनी थकवलेली एफआरपी वरील १५ टक्के व्याजसह वसुल करणे ही संघटनेची भुमीका असेल.
- विठ्ठल पवार, प्रदेश अध्यक्ष तथा सदस्य ऊसदर नियमक मंडळ, महाराष्ट्र राज्य 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News