आधी स्वतःला ओळखा मग करिअर निवडा: उपजिल्हाधिकारी संजयकुमार डव्हळे

आशिष ठाकरे
Monday, 8 July 2019

जिल्हाभरातून आलेल्या 117 विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

चिखली :  आधी स्वतःची आवड क्षमता इच्छा काय आहे ते ओळखा मग योग्य करिअर निवडा, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी केले. स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयात सगे सोयरे मंडळी, चिखलीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय व्यवसाय मार्गदर्शन व गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. जिल्हाभरातून आलेल्या विद्यार्थी व पालकांच्या भरगच्च उपस्थितीत यशस्वी झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.अनिल गारोडे तर प्रास्ताविक विजय खरपास यांनी केले. 

पुढे बोलताना उपजिल्हाधिकारी श्री. डव्हळे म्हणाले, जर तुम्हाला रुग्णसेवेचे आवड असेल तर डॉक्टर व्हा, मशीन व कम्प्युटरबद्दल प्रेम असेल तर इंजिनीअर व्हा पण यासाठी स्वतःची आवड व इच्छा ओळखा परंतु महत्त्वाचे म्हणजे आपली क्षमता नीट समजून घ्या आणि मगच करिअर निवडा.जसे शिवाजी महाराजांनी ऐषोआरामात जीवन न जगता खडतर मार्ग स्वीकारून स्वतःच्या इच्छा व क्षमतेवर स्वराज्याची निर्मिती केली. आज समाजाची उन्नती आणि प्रगती होण्यासाठी समाज संघटित असणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. दुसर्‍या सत्रात यानंतर प्रश्नोत्तरे झालीत. 

कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय विलास भाडाईत, किशोर वाघ, प्रा.डॉ.सुभाष गव्हाणे यांनी केले. संचालन विजय मोंढे तर आभार प्रदर्शन भगवान आरसोडे यांनी केले. यशस्वीतेसाठी टीम एसएसएमचे ज्ञानेश्वर खाडे, रवी गुंजकर, भगवान आरसोडे, विजय खरपास, समाधान शेळके, दत्ता सिताफळे, प्रल्हाद होगे, जितेंद्र सीताफळे, दिनेश सीताफळे, दिनेश पवार, विकास खंडागळे, उमेश जपे, दिनेश जपे, गिरीश शेळके आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला चारशेहून अधिक विद्यार्थी पालक उपस्थित होते.
 

कार्यक्रमात विविध सत्कार
जिल्हाभरातून आलेल्या 117 विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या विविध सेवा स्वीकारणार्‍यांचा सत्कार करण्यात आला

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News