पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019
  • विवेकानंद विद्यालय प्रवेशोत्सव; माजी विद्यार्थ्यांचा सहभाग

यवतमाळ: येथील विशुद्ध विद्यालय संचालित विवेकानंद विद्यालयात आज (ता. 26) रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते उपस्थित होते. संस्थेच्या संचालक सुषमा दाते, समन्वयक विजय कासलीकर, अतिथी मीरा व शैलेश बावडेकर, विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन केळापुरे, पर्यवेक्षक पुरुषोत्तम बोबडे, माजी मुख्याध्यापक डॉ. नितीन खर्चे, माजी विद्यार्थी अजय सकरावत, शैलेश दालवाला, राहुल तत्ववादी व वासुदेव विधाते प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
           
सरस्वती व राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. संगीत शिक्षक व पुर्णाजी खानोदे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले. प्रास्ताविक पर्यवेक्षक पुरुषोत्तम बोबडे यांनी केले. 
          
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते यांनी नव्या सत्राकरिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. समन्वयक विजय कासलीकर यांनी माजी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सवातील सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. शैलेश बावडेकर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. अजय सकरावत व वासुदेव विधाते यांनी त्यांना या शाळेतून मिळालेल्या उत्तम संस्काराबद्दल आनंद व्यक्त करतानाच नवीन विद्यार्थ्यांना शाळेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना वही व पेन भेट देण्यात आला. त्याचप्रमाणे वर्ग पाच ते आठच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावर्षी निवृत्त होत असलेले मुख्याध्यापक मोहन केळापुरे व प्रयोगशाळा सहाय्यक लक्ष्मण वानखडे यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्याम डगवार, सचिन चौधरी, प्रशांत पोहणकर, हरी दोडशेट्टीवार, प्रेमेंद्र रामपूरकर, संजय काकाणी, उमेश हांडा, राजू देशमुख, बाळासाहेब शिंदे, सुरेंद्र नार्लावार, सुनील जोशी, राजेश अमरावत, डॉ. चंद्रशेखर देशपांडे, संजय गंडेचा, डॉ. प्रदीप झिलपिलवार, प्रकाश शिदड हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
            
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय येवतकर यांनी केले. विवेक कवठेकर यांनी आभार मानले. हेरंब पुंड, विवेक अलोणी, संतोष पवार, महेश कोकसे, निलेश पत्तेवार, मीनाक्षी काळे, जया बेहरे, पूनम नैताम यांनी स्वागत केले. त्यानंतर शालेय परिसरात पाहुण्यांच्या हस्ते कडुनिंबाच्या झाडांचे रोपण करण्यात आले. यावेळी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News