सगळ्यात आधी पहिली कट ऑफ लिस्ट साताऱ्यात जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019

पहिल्या यादीत समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांनी पाच जुलैपर्यंत प्रवेश निश्‍चित करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. 

सातारा - अकरावी प्रवेशासाठी महाराजा सयाजीराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेची खुल्या प्रवर्गाची पहिली यादी ९५.४०, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेजची ९० तसेच लाल बहादूर शास्त्री कॉलेजची ८२.०४ टक्‍क्‍यांवर बंद झाली आहे. उद्या (सोमवार) दुपारी तीन वाजेपर्यंत विविध कनिष्ठ महाविद्यालयांत पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. पहिल्या यादीत समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांनी पाच जुलैपर्यंत प्रवेश निश्‍चित करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. 

कट ऑफ लिस्ट 
विज्ञान ः महाराजा सयाजीराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सातारा ः 
खुला ः ९५.४०. एस. सी. ः ९१.८०. एस. टी. ः ८७.४०. व्हीजे (ए) ः ९१.६०. एनटी (ब) ः ९४. एनटी (सी) ः ९३. एनटी (ड) ः ९२.४०. एसबीसी ः ९२.२०. ओबीसी ः ९२.६०. एसईबीसी (मराठा समाज आरक्षण) ः ९३.४०. प्रकल्पग्रस्त- भूकंपग्रस्त ः ५७. माजी सैनिक ः ९०.८० टक्के.

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा ः 
खुला ः ८२.०४. एस. सी. ः ५५.०२. एस. टी. ः ५१.०२. व्हीजे (ए) ः ६७.८०. एनटी (ब) ः ६४.०२. एनटी (सी) ः ७२.०२. एनटी (ड) ः ७४.०४. एसबीसी ः ७४.०४. ओबीसी ः ५६. एसईबीसी ः ५९.०२ टक्के. 

यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा ः 
खुला ः ९०. एस. सी. ः ६३. एस. टी. ः सर्व पात्र. व्हीजे (ए) ः ७२. एनटी (ब) ः ७३.८०. एनटी (सी) ः ७७.८०. एनटी (ड) ः ६१. एसबीसी ः सर्व पात्र. ओबीसी ः सर्व पात्र. एसईबीसी ः ८३.४०. ईडब्लूएस (आर्थिक दुर्बल घटक) ः सर्व पात्र. दिव्यांग ः ६०. प्रकल्पग्रस्त- भूकंपग्रस्त ः ७३.४०. माजी सैनिक, क्रीडा, स्वातंत्र्यसैनिक, बदली ः ८३.४० टक्के.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News