चिकलठाणा येथे शाळेला आग; शाळेची सुरक्षा टांगतीला पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019

शाळा सुरू होवून आठवडाही उलटला नसतानाच अनोळखी व्यक्‍तींनी चिकलठाणा येथील अभिनव इंटरनॅशनल स्कूलला आग लावल्याची घटना मंगळवारी (ता. 18) रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली.

औरंगाबाद - शाळा सुरू होवून आठवडाही उलटला नसतानाच अनोळखी व्यक्‍तींनी चिकलठाणा येथील अभिनव इंटरनॅशनल स्कूलला आग लावल्याची घटना मंगळवारी (ता. 18) रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली. अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेत तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्‍यात आली.

चिकलठाणा येथील पोलिस ठाण्याच्या समोर गेल्या पाच वर्षांपासून अभिनव इंटरनॅशनल या नावाने सुरू असलेल्या शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंत 300 विद्यार्थी शिक्षण घेतात. उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर सोमवारपासून (ता. 10) शाळेस सुरवात झाली.

आठवडा उलटत नाही. तोच मंगळवारी रात्री अनोळखी व्यक्‍तीने शाळेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्याने शाळेतील काही कागदपत्रे बाहेर फेकून इतर साहित्याला आग लावली. ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. तसेच याची माहिती मिळताच चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. तब्बल तीन तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्‍यात आली.

मात्र, यात शालेय साहित्य जळून खाक झाले. या घटनेनंतर शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनीही धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष विजय वाडकर यांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News