अरुण जेटली उपचार घेत असलेल्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयाला आग

सकाळ (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

दिल्लीतील एम्स रूग्णालयाला आग लागल्याची घटना आता उघडकीस आली आहे. एम्स रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे.

दिल्ली : दिल्लीतील एम्स रूग्णालयाला आग लागल्याची घटना आता उघडकीस आली आहे. एम्स रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे.

घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या दहा गाड्या पोहोचल्या असून आग विझवण्याचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसाले तरी रुग्णालयातील विद्युत वाहिनीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाड अथवा शॉक सर्किट मुले ही आग लागल्याचे म्हटले जात आहे.   

दरम्यान, माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली हे देखील याच रूग्णालयात दाखल आहेत आणि त्यांच्यावर उपचार चालू आहेत. एम्स रुग्णालयातील इमरजन्सी वॉर्डजवळ ही आग लागली आहे. तसेच रूग्णालायत कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. सध्यातरी या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News