प्रिया दत्त यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या काही खास गोष्टी

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Wednesday, 28 August 2019
  • बॉलिवूड स्टार सुनील दत्त आणि नर्गिस यांची मुलगी प्रिया दत्तचा आज वाढदिवस 

मुंबई : बॉलिवूड स्टार सुनील दत्त आणि नर्गिस यांची मुलगी तसेच बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची बहीण प्रिया दत्तचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला  प्रिया दत्तच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत. चला तर मग पाहूयात.........

-28 ऑगस्ट 1966 ला प्रिया दत्त यांच जन्म झालं होता. प्रिया दत्त लहानपणापासून खूप वेगळ्या असून वडिल सुनिल दत्तची लाडकी होती. 

-समाजसेवा आणि राजकारणात करियर सुरु करुन राजकीय क्षेत्रात स्वत;चं अस्तित्व बनवणारी महिला म्हणून तिची ओळख आहे. 

-प्रिया दत्तचं शिक्षण हे मुंबई सोफिया कॉलेजमध्ये गॅज्युएशन पुर्ण केलं. त्यांतर प्रियाने न्यूयॉर्क येथे टिव्ही प्रॉडक्शनमध्ये डिप्लोमा पुर्ण केलं. 

-2004मध्ये वडिल सुनील दत्त यांच्या निधनानंतर प्रिया यांनी पॉलिटिक्समध्ये पाऊल ठेवलं. 2009मध्ये दोन वेळा त्या खासदार बनल्या. तर 2014च्या लोकसभा निवडणूकित भाजपच्या पुनम महाजन यांनी प्रिया दत्त यांना हरवलं. 

-27 नोव्हेंबर 2003मध्ये त्यांचं लग्न ओवेन रोनकॉनसोबत झालं. प्रिया आणि ओवेन यांना दोन मुल आहेत. ओवेन हे इंटरटेंमेन्ट बिजनेसमॅन आहेत. 

काय करतात प्रिया दत्त? 
प्रिया दत्त एक समाजसेविका आहेत. नेहमीच त्या गरजूंना मदत करताना दिसून येतात. याचसोबत प्रियाकडे आणखी काही जिम्मेदारी आहेत. तसेच प्रिया शक्तीशाली महिला, उद्योजक, माजी खासदार आणि आई देखील आहेत.

कधीही चित्रपटांमध्ये रस नव्हता
कुटुंबातील त्यांची बहीण नम्रता वगळता सर्व हिंदी सिनेमाशी संबंधित आहेत. परंतु त्यांनी स्वत: ला चित्रपटांपासून दूर ठेवून राजकारणात जाणे पसंत केले. तसेच त्यांनी चित्रपटात काम करण्यास कधीही रस दाखविला नाही. 

संपूर्ण कुटुंब बॉलीवूडमध्ये आहे 
वडील सुनील दत्तने अनेक सुपरहिट चित्रपट दिले, त्यांची आई नर्गिस यांचेही चित्रपटांशी चांगल नाते होते. तसेच भाऊ संजय दत्त हा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेताही आहे.
  
प्रिया दत्तयांनी एक पुस्तकही लिहिले आहे
प्रिया दत्तयांनी त्यांची बहीण नम्रता दत्त यांच्यासोबत 'मिस्टर अँड मिसेस दत्त: मेमरीज ऑफ अवर पॅरेंट्स' नावाचे पुस्तकही लिहिले आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News