अर्थ संकल्प जाहीर, आता नोटा नाही, 'या' नाण्यांचा खळखळाट होणार 

तृषा वायकर (यिनबझ टीम)
Friday, 5 July 2019

2.0 सरकारने आज अर्थ संकल्प सादर केला, त्यात अर्थमंत्री निर्मला सितारामण देशात नव्या नाण्यांची निर्मीती होणार असल्याची माहिती दिली.

मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनातील ५०० व १००० रुपयांच्या नोटा हद्दपार केल्या. त्याचाच भाग म्हणून बाजारामध्ये ५०० रुपयाच्या नवीन नोटा चलनात आणल्या तर २०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटादेखील बाजारात आणल्या.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपा सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी २० रुपयाचं नवीन नाणं बाजारात येणार असल्याची घोषणा केली, तसेच सध्या बाजारात असलेली १, २, ५ आणि १० रुपयांची असलेली नाणी नव्या रुपात बाजारात येणार असल्याचे सांगितले. नोटांचे नाण्यात रुपांतर झाले तर अंध व्यक्तींना रक्कम ओळखण्यात मदत होईल, असं मत सितारामन यांनी व्यक्त केले.

२० रुपयाच्या नाण्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, मार्चमध्ये घोषणा करण्यात आली होती. 

20 रुपयांचं नाण का आहे इतकं खास...

  • ८.५४ ग्रॅम वजन असलेल्या या नाण्याला १२ किनारे असून काठावर कोणत्याही प्रकारची डिझाईन नसणार आहे. 
  • हे नाणे बनवताना ६५ टक्के तांबे, २० टक्के निकेल आणि १५ टक्के जस्ताचा वापर करण्यात आला आहे.
  • या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचे निशाण आहे तर दुसऱ्या बाजूस सत्यमेव जयते लिहण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News