तरुणांमध्ये फिल्मी स्टाईलने हाणामारीचे प्रमाण वाढले

विशालराज पाटील
Monday, 29 July 2019
  • मल्हारपेठ भागात अनेकदा दारूच्या नशेत त्या मारामाऱ्या 

मल्हारपेठ (जि. सातारा) : परिसरातील ढाब्यावर तरुणांमध्ये मारामारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत पोलिसात गुन्हे दाखल होत नसल्याने त्यात वाढ होताना दिसत आहे. अनेकदा दारूच्या नशेत त्या मारामाऱ्या होत असल्याचे दिसते. त्यामुळे त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांना गांभीर्याने पाहावे लागणार आहे. 

कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस महत्त्वाचे असतात. मात्र, पोलिसांकडून त्यात हलगर्जी झाल्यास समाजाला वेठीस धरणाऱ्या अनेक घटना विनाकारण घडताना दिसतात. त्यात फिल्मी स्टाइलने दोन गटांत राडा, ढाब्यावर जेवायला गेल्यास होणारी मारमारी अशा घटनांवर अंकुश राहण्याची गरज आहे. अशा घटना झाल्या की, त्याचे गुन्हे दाखल होत नाहीत. परिणामी त्या घटना वाढताना दिसत आहेत.

त्यात पुढाऱ्यांची तडजोडीसाठी मध्यस्थी वाढली आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी अशी फिल्मी स्टाइलचा राडा झाला. त्यात ढाबा मालकास मारहाण झाली. तेथील साहित्याची मोडतोड झाली. शिवीगाळ झाली. नागरिकांनी याबाबतची माहिती मल्हारपेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी संबंधिताना पकडून पोलिसात आणले. झटापटीत डोक्‍याला मार लागल्यामुळे आरोग्य केंद्रात पाठवले.

मात्र, गुन्हा दाखल झाला नाही. त्याची प्रक्रिया सुरू असतानाच काही पुढाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि ते प्रकरणच मिटवण्यात आले. अशा घटनांवर पोलिसांनी धाक दाखविण्याऐवजी तडजोडीचा प्रकार केल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळत आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News