‘वन्स मोअर’ चित्रपटामध्ये विष्णू मनोहर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019
  • अभिनयासह निर्मिती क्षेत्रात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या खाद्यपदार्थांच्या रेसिपी तर जगजाहीर आहेत.
  • ते म्हणाले, ‘अभिनयाची आवड मला पहिल्यापासून होती. ती आता या  चित्रपटाच्यानिमित्ताने पूर्ण झाली. या चित्रपटात मी एका राजाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची मी निर्मितीही करत असल्याने हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे.’

अभिनयासह निर्मिती क्षेत्रात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या खाद्यपदार्थांच्या रेसिपी तर जगजाहीर आहेत. वेगवेगळ्या पदार्थांवर त्यांचे प्रेम असले तरी अभिनय क्षेत्रात येण्याची त्यांची इच्छा होती.

विष्णू मनोहर यांची ही इच्छा ‘वन्स मोअर’ या चित्रपटामुळे पूर्ण झाली आहे. या चित्रपटामधून त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे, इतकंच नव्हे तर या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारीही त्यांनी पेलली आहे.

ते म्हणाले, ‘अभिनयाची आवड मला पहिल्यापासून होती. ती आता या  चित्रपटाच्यानिमित्ताने पूर्ण झाली. या चित्रपटात मी एका राजाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची मी निर्मितीही करत असल्याने हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे.’ नरेश बिडकर दिग्दर्शित या चित्रपटात विष्णू मनोहर यांच्याबरोबरच रोहिणी हट्टंगडी, भारत गणेशपुरे, आशुतोष पत्की, धनश्री दळवी आदी कलाकार दिसणार आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News