खेकड्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा - राष्ट्रवादी युवक काँग्रेस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी हे धरण फुटण्याला खेकडे जबाबदार असल्याचे असे बेजबाबदार विधान करून २३ मृत लोकांचा अपमान केला आहे. खेकड्याला तातडीने अटक करुन ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.

पुणे : जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी हे धरण फुटण्याला खेकडे जबाबदार असल्याचे असे बेजबाबदार विधान करून २३ मृत लोकांचा अपमान केला आहे. खेकड्याला तातडीने अटक करुन ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. तसेच या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड देखील ट्विट करीत सरकारवर टीका केली आहे.

खेकड्याला तातडीने अटक करुन ३०२ चा गुन्हा दाखल करण्याच्य मागणीठी कोल्हापुर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुर येथील शाहुपुरी पोलीस स्टेशनला जाऊन या मागणीची तक्रार देण्यात आली यावेळी कार्यअध्यक्ष रविकांत वर्पे , सुरज चव्हाण , जिल्हा अध्यक्ष रोहीत पाटील , अदिल फरास , शहराध्यक्ष महेन्द्र  चव्हाण व पदाधिकारी उपस्थीत होते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News