आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी संशयास्पद : सर्वपक्षीय सदस्यांची समिती नेमा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019
  • सर्वपक्षीय समिती स्थापण्यासाठी धनंजय मुंडे यांची मागणी

मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. त्यावर बोलताना आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी तपासून पाहण्यासाठी दोन्ही सभागृहांतील सर्वपक्षीय सदस्यांची समिती नेमण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. 

जगभरातील प्रसिद्ध १०८ अर्थतज्ज्ञ व सांख्यिकी शास्त्रज्ञांनी मार्च २०१९ मध्ये भारतात सध्या जी अर्थविषयक आकडेवारी दिली जात आहे ती वाढवून सादर केली जाते असल्याबाबतचे निवेदन केले होते. त्याचेच समर्थन करणारे विधान माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी केले होते. सध्याचा भारताचा विकासदर (जीडीपी) अडीच टक्‍क्‍यांनी फुगवून सांगितला आहे, असे मत सुब्रह्मण्यम यांनी मांडले होते.

आजचा आर्थिक अहवाल राज्याच्या अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. त्यामुळे त्यातील आकडेवारीच्या खरेपणाविषयी संशय व्यक्त करत या प्रकरणी सर्व पक्षीय समिती स्थापन करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी स्थिर किमतीवर आधारित असल्यामुळे त्यात कोणताही बदल करण्याचा प्रश्‍नच येत नाही. 
- दीपक केसरकर, अर्थ राज्यमंत्री

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातल्या आकडेवारीविषयी संशय निर्माण होत आहे. दोन्ही सभागृहांतील सदस्यांची समिती नियुक्त करून निदान नमुना पातळीवर अहवालाची पडताळणी केली जावी.
- धनंजय मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षने

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News