किरकोळ कारणावरुन  कॉलेज तरुणांत तलवारी काडुन तुंबळ मारामारी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019

किरकोळ कारणावरुन विरार मध्ये कालेज तरुणात तलवारी काडुन तुंबळ मारामारी ; हत्यारासह चार तरुणांना अटक 

नालासोपारा :- विरार पश्चिम विवा कालेज समोरील देशी चाय कट्ट्यावर एकमेकाकडे पाहुन ठस्सन देण्याच्या कारणावरुन चक्क कालेज तरुणाच्या दोन गटात तलवारी काडुन तुंबळ मारामारी झाल्याची घटना रविवार ता. अठ्ठाविस रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. मात्र  विरार पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने कोनताही अनुचित प्रकार घडला नाही.

या प्रकरणात दोन्ही गटातील चार तरुणांना तात्काळ ताब्यात घेवुन त्यांच्यावर दंगल घडविने, सह शस्त्र अधिनियम कायदा कलम चार, पंचेविस, मुंबई पोलिस कायदा कलम 37 आणि 137 प्रमाणे गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केले आहे. रणजीत तानाजी दळवी, मोईन इरशाद खान, निसर्ग कनु पटेल, आणी अभिषक चंद्रशेखर पुजारी असे अटक करण्यात आलेल्या तरुणांचे नाव आहेत. अटक झालेले तरुण हे सर्वच प्रतिष्टीत घरातील आहेत. तर यांचे दहा ते पंधरा साथीदार फ़रार आहेत.

26 जुलै रोजी या तरुणांमध्ये एकमेकांत ठस्सन करण्याच्या किरकोळ कारणावरुन विरार पश्चिम विवा कालेज समोरील देशी चाय कट्टा याठिकाणी वाद निर्माण झाला होता. या वादातुन त्यांचे भांडणही झाले. त्यानंतर दुस-या दिवशी पुन्हा वाद झाला. आणि तीस-या दिवसी मात्र रविवारी या तरुणांनी चक्क विरार पुर्व मोर्या नगर परिसरात येवुन तलवारी हातात घेवुन तुंबळ हानामारी सुरु केली होती. पण ही घटना विरार पोलिसांना समजताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील एक तलवार, एक चाकु असे हत्यारही जप्त केले आहेत. शेवटी या प्रकरणात पोलिसांनीच तक्रारदार बनुन कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गैरकायद्याची मंडळी जमवुन दंगल घडविण्याच्या उद्देशाने हातात शस्त्र वापरल्याप्रकरणी सहशस्त्र अधिनियम कायदा कलम 4, मुंबई पोलिस कायदा कलम 37 आणि 135 प्रमाणे गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News