फर्ग्युसन महाविद्यालय आता विद्यापीठ

YIN BUZZ TEAM
Thursday, 24 January 2019

पुणे येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातील अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली. नव्या फर्ग्युसन विद्यापीठाचे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सुरू होतील. फर्ग्युसन महाविद्यालय स्वायत्त विद्यापीठ झाले आणि पुण्याला सात दशकांनंतर सरकारी निधीवर चालणारे नवे विद्यापीठ मिळाले. हा आंनदाचा क्षण साजरा करण्यासाठी या महाविद्यालयातील चांगले अनुभव, क्षण, शुभेच्छा  नागरिकांनी 'यीन'च्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

पुणे : पुणे येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातील अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली. नव्या फर्ग्युसन विद्यापीठाचे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सुरू होतील. फर्ग्युसन महाविद्यालय स्वायत्त विद्यापीठ झाले आणि पुण्याला सात दशकांनंतर सरकारी निधीवर चालणारे नवे विद्यापीठ मिळाले. हा आंनदाचा क्षण साजरा करण्यासाठी या महाविद्यालयातील चांगले अनुभव, क्षण, शुभेच्छा  नागरिकांनी 'यीन'च्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

''फर्ग्युसन महाविद्यालय आता विद्यापीठ होणार याचा मला खुप आनंद वाटत आहे. माझी मुलगी या महाविदयालयाची माझी विद्यार्थिनी आहे. येथील शिक्षण पध्दती आणि उपक्रम अतिशय चांगले होते. येथील शिस्त चांगली होती ज्यामुळे माझी मुलगी चांगल्या गुणांनी पास होऊन इंजिनिअर झाली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाचे खुप खुप आभार. पुढील वाटचालीसाठी महाविद्यालयाला मनपुर्वक शुभेच्छा.''  
- रानडे विद्याधर, माजी विद्यार्थींनीचे पालक

'फर्ग्युसन महाविद्यालय आता विद्यापीठ होणार हे अतिशय आंनदाची बाब आहे. या महाविद्यालयात 1996 ते 2001 मधील शैक्षणिक काळ आय़ुष्यातील अविस्मरणीय काळ आहे. आज या निमित्ताने महाविद्यालयाला भेट देवून जुन्या आठवणींना उजाळा देत आहोत. पुढील वाटचालीसाठी महाविद्यालयाला हार्दिक शुभेच्छा.'' 
- नवनाथ वाघमोडे, चेतन तुपे, योगेश बोरोटे, माजी विद्यार्थी (बी.ए.), फर्ग्युसन महाविद्यालय

''माझे फर्ग्युसन महाविद्यालय आता विद्यापीठ झाले. आम्हा सर्वांना याचा खुप अभिमान आहे. आमचे तत्कालीन प्राचार्य देवदत्त दाभोळकर आम्हा ग्रामीण विद्यार्थ्यांचे खरे़खुरे देवदत्त होते. त्यांच्या कार्यालयाबाहेर सहकार्यासाठी भेट घेण्यासाठीचा फलक नेहमी होता. फी किंवा अन्य अडचणी सरांनी सहज सोडवल्या. मी, प्रदीप भिडे, डॉ. एम. बी. आबनावे, अॅड. सुरेश कोद्रे व आमच्या ग्रामीण भागातील मित्र परिवाराचा फर्ग्युसन महाविद्यालयशी कायम जिव्हाळा राहीला. फर्ग्युसन महाविद्यालयाचे खुप खुप अभिनंदन.''
- प्रकाश फुलारे, माजी विद्यार्थी (१९७०),फर्ग्युसन महाविद्यालय

''फर्ग्युसन विद्यापिठाला हार्दिक शुभेच्छा. मी वसंत रघुनाथ देसाई पी.एम.स. गृप घेऊन फर्ग्युसनमधून बी.एससी. उतीर्ण झालो.''
- वसंत रघुनाथ देसाई, माजी विद्यार्थी, फर्ग्युसन महाविद्यालय

''मी फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे हे सांगणे माझ्यासाठी नेहमीच अभिमानास्पद आहे. महाविद्यालयातील शिक्षणा आणि येथील आठवणींमुळे
आयुष्यातल्या कठीण प्रसंगांवर मात करू शकले. 
कॉलेजच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा''
- मनीषा जमदग्नी, माजी विद्यार्थी (१९८६ बी.एससी.) ,फर्ग्युसन महाविद्यालय

''डी. इ. सोसयटीचे फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापिठाचा दर्जा मिळाला हे खरचं खुप उत्तम झाले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाशी संबधित सर्वांना शुभेच्छा.''
- पंकज शहा, माजी विद्यार्थी (1976), फर्ग्युसन महाविद्यालय

''फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापिठाचा दर्जा मिळाल्याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो.''
- रविंद्र देशपांडे.  बी.एससी. (1975 ते 1977) ,फर्ग्युसन महाविद्यालय

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News