असा बनवा मेथी भाजीचा [तिखट] केक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019

मेथी भाजीचा [तिखट] केक

साहित्य 

  • १ मेथीच्या जुडीची पाने
  • कोवळ्या दांड्या असल्या तर चालतील
  • धुवुन जाडसर चिरुन घ्यावी
  • १ कप जाड रवा..
  • ३/४ कप बेसन..
  • १ कप तेल..
  • १ कप दुध..
  • १ कांदा बारीक चिरलेला..
  • १ टिन क्रीम स्टाईलअमेरिकन कॉर्न
  • हिरवी मिरची+आले वाटुन केलेली पेस्ट ३ चमचे
  • मीठ चवीनुसार..
  • हळद १ टी स्पुन.
  • १ टी स्पुन बेकिंग पावडर..
  • २ टी स्पुन साखर...
  • १ कप काजु+बदाम तुकडे..[भरपुर हवे]
  • किसलेले सुके/ओले खोबरे अर्धी वाटी

कृती

  1. एका मोठया बाऊल मधे तेल,दुध,मिरची-आले पेस्ट,मीठ, साखर ,हळद घालुन मिश्रण ढवळुन घ्यावे..
  2. आता कांदा,रवा,बेसन व बेकिंग पावडर घालुन मिक्स करा..
  3. काजु-बदाम व मेथीची भाजी,कॉर्न घालुन मिक्स करा..
  4. बेकिंग ट्रे ला [मोठा ]केक टिन चालेल] तेलाने कोटींग करुन घ्या..त्यात केक मिश्रण टाकुन चमच्याने नीट एकसारखे पसरवुन घ्या..वरुन खोबरे किस पेरा..अगदी हलक्या हाताने किस चिकटेल इतपत दाबा ..
  5. ओव्हन मधे ३५० फॅ.वर सधारण ४५ मिनिटे ते एक तास पर्यंत बेक करा..
  6. थंड झाल्यावर वडयांच्या आकारात कापा..

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News