दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019

युवा सेनेतर्फे दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आयुष्मान भारत योजना शिबिरही घेतले.

गंगापूर - युवा सेनेतर्फे दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आयुष्मान भारत योजना शिबिरही घेतले. संतोष माने यूथ फाउंडेशन, ओम साई मल्टिसर्व्हिसेस यांच्यातर्फे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित मंगळवारी (ता. १८) हा उपक्रम राबविला. 
यावेळी विद्यार्थ्यांना पुरस्कार, प्रत्येकी एक रोपटे देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा सेनेचे युवा जिल्हा अधिकारी संतोष माने होते.  याप्रसंगी तालुकाप्रमुख सुभाष कानडे, तालुका युवा अधिकारी मच्छिंद्र देवकर, जिल्हा दूध संघाचे संचालक दिलीप निरपळ, उपनगराध्यक्ष मंगला राजपूत, उपतालुकाप्रमुख अर्जुनसिंग राजपूत, शिक्षक सेनेचे भगवान हिवाळे, उपजिल्हाप्रमुख अनिल काळे, प्रकाश दुबे, उपतालुकाप्रमुख रमेश निश्‍चित, नगरसेवक भाग्येश गंगवाल, मुकुंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. संतोष माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी एस.टी. महामंडळातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या चालकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यातआले.

सत्कार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांत ऋतुजा गायकवाड, समता पवार, वैष्णवी पवार, दत्तराज जाधव, मयूरी ढोले, दत्तराज जाधव, ऋतिका देवळे, मयूरी लांडे, जयश्री काळे, अंकिता गायकवाड, दिव्या गायकवाड, ऋतिक आरगडे, वैष्णवी बर्वे, आरती कौर, पवन धर्मराज, शीतल जाधव, शुभांगी सुंब, तेजस्विनी रोकडे, श्रेया रत्नपारखे, अनुराधा झेंडे, महेश सुकाशे, श्रीपाद जोशी, नारायण दुबिले, कृष्णा लबडे यांचा समावेश आहे. डॉ. आबासाहेब शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग कापे यांनी आभार मानले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News