...म्हणून रेल्वे तिकीट बुक करताना आवडती सीट निवडता येत नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

सध्या सुट्टीचे दिवस आहेत, प्रत्येकजण फिरायला जाण्यासाठी तयारीत असतो. दूरच्या ठिकाणी जायचं म्हणजे आपण आधीच आपली सीट बुक करून ठेवत असतो.

सध्या सुट्टीचे दिवस आहेत, प्रत्येकजण फिरायला जाण्यासाठी तयारीत असतो. दूरच्या ठिकाणी जायचं म्हणजे आपण आधीच आपली सीट बुक करून ठेवत असतो. बसमध्ये प्रवास करताना तर आपल्या सोयीनुसार आपण सीट निवडू शकतो. त्यातच विंडो सीटसाठी प्रत्येकाचा अट्टाहास असतो. मात्र रेल्वेचं आरक्षित तिकीट बुकिंग करताना आपल्याला पाहिजे ती सीट मिळत नाही.  त्याठिकाणी आपल्या आवडीची सीट निवडण्याचा कोणताही पर्याय दिला नसतो. 

यामागचं कारण देखील तेवढंच महत्वाचं आहे. रेल्वेतून रोज मोठ्या संख्येने प्रवासी ये जा करत असतात. त्यामुळे सर्व कोचमध्ये समान प्रवासी कसे जातील याकडे रेल्वेचे लक्ष असते. यासाठी रेल्वेचे तिकीट बुकिंग सॉफ्टवेअर वेगळ्या पद्धतीने बनविण्यात आले आहे.

रेल्वेतील प्रत्येक कोचमध्ये एकूण ७२ सीट्स असतात. तुम्ही ज्यावेळी तिकीट बुक करता त्यावेळी  रेल्वेचे सॉफ्टवेयर मिडल कोच कंपार्टमेंटमध्ये सीट नंबर ३० – ४० दरम्यान कोणतीतरी लोवर सीटचा पर्याय देते. त्यानंतर बॅलेन्स बनवण्यासाठी अप्पर सीट आणि मिडल सीटचे अलॉटमेंट होते. मिड्लपासून सुरु होणाऱ्या सीट्स बुकिंग लोवर बर्थ, मिडल बर्थ आणि शेवटी अप्पर बर्थ अशापद्धतीने अलॉट केल्या जातात. 

रेल्वेमधून आरक्षित तिकीट बुक करण्यासाठी एकाचवेळी खुपजण तिकीट बुक करत असतात. त्यामुळे ऑनलाईन तिकीट बुक करताना देखील प्रत्येक कोचमध्ये एकसमान प्रवासी आहेत की नाही, हे पाहण्याचं काम सॉफ्टवेअरमार्फत होत असते. 

अशापद्धतीने समान तिकीट बुकिंग दिल्याने सर्व कोचमध्ये समान प्रवासी जातात. याशिवाय प्रत्येक कोचचे वजन समान राखण्यात मदत होते. या वजनामध्ये फरक असल्यास रेल्वेची स्थिरता धोक्यात येण्याची शक्यता असते. म्हणजेच आप;या आवडीची सीट निवडणे हे आपल्यासाठीच धोकादायक असू शकते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News