बापाच्या कष्टाचे पोराने केले चिज

उमेश वाघमारे
Thursday, 6 June 2019
  • गणेशराव इंगळे हे शहरातील एका इंग्लिश स्कुल बसचा आॅटोरिक्षा चालवतात.
  • मधल्या वेळेत ते इतरांच्या घराचे रंग काम करतात
  • मुलगा शुभम गणेशराव इंगळे याने नीट परीक्षेत तब्बल 563 गुण मिळाले

जालना: स्कुल बसचा रिक्षा चालवत आणि इतरांच्या घराचे रंग काम करत बापाने मुलाला शिकवले. बापाच्या कष्टांचे पोराने चिज केले आहे. स्कुल बसचा आॅटोरिक्षा चालक गणेशराव इंगळे यांचा मुगला शुभम गणेशराव इंगळे याने नीट परीक्षेत तब्बल 563 गुण मिळाले.

गणेशराव इंगळे हे शहरातील एका इंग्लिश स्कुल बसचा आॅटोरिक्षा चालवतात. तसेच मधल्या वेळेत ते इतरांच्या घराचे रंग काम करतात. आपल्या कुटुंबाचा गाडा ते अशाच पद्धतीने ओढत आहेत. मात्र जे दारिद्रे आपल्या पदरी आले, ते आपल्या मुलाच्या नको, यासाठी त्यांनी काबाड कष्ट करून मुलाला शिक्षण देत आहेत. नुकताच नीटचा निकाल लागला. या परीक्षेत शुभम गणेशराव इंगळे यांने 563 गुण मिळाले. या यशाबद्दल शुभम इंगळे यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. 

शिकवणीची फीस माफ
'आर्थिक परिस्थिती हालाकीची असतांना शुभम इंगळे यांनी जिध्दीने अभ्यास केला. त्याने माझ्याकडे खासगी शिकवणी लावली होती. त्याच्या कष्टाला पाहून फीस माफ केली'.   
- श्री. अंकुश सोनुने 

नऊ तास अभ्यास
'जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये तीन वेळा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला होता. खासगी शिकवणीचे वेळापत्रक ती फॉलो केले होते. परीक्षेच्या तयारीसाठी नऊ तास अभ्यास करत होतो.
- शुभम इंगळे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News