उपवासाचा मेदूवडा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 10 August 2019

साहित्य - एक वाटी वरईचे तांदूळ, दोन बटाटे, ४-५ हिरव्या मिरच्या, एक इंच आले, अर्धी वाटी कोथिंबीर, मीठ, एक मोठा चमचा जिरे, तळण्यासाठी तेल, एक मोठा चमचा तूप. 

साहित्य - एक वाटी वरईचे तांदूळ, दोन बटाटे, ४-५ हिरव्या मिरच्या, एक इंच आले, अर्धी वाटी कोथिंबीर, मीठ, एक मोठा चमचा जिरे, तळण्यासाठी तेल, एक मोठा चमचा तूप. 

कृती - वरईचे तांदूळ धुऊन निथळत ठेवावेत. दोन वाट्या पाणी उकळत ठेवून त्यात एक मोठा चमचा तूप आणि थोडेसे मीठ घालून पाणी उकळावे. उकळलेल्या पाण्यात धुतलेले तांदूळ घालून भात शिजवून घ्यावा. थोडा मऊ भात झाला पाहिजे. उकडलेले बटाटे सोलून कुस्करून घ्यावेत. मिरची आणि आले जाडसर वाटून घ्यावे. भातात बटाटे, वाटलेलं आलं-मिरची, मीठ, जिरे, चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करून मळून घ्यावे. मिश्रणाचे छोटे छोटे चपटे गोळे करून मध्यभागी बोटाने भोक पाडावे. तयार झालेले सगळे वडे मध्यम गॅसवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News