उपवासाचा दहिवडा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 5 August 2019

साहित्य 
1. चार मध्यम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे
2. दीड वाटी उपवासाची भाजणी
3. राजगिरा व शिंगाडा पीठ प्रत्येकी एक टिस्पून
4. दाण्याचे कूट एक वाटी
5. दही मोठ्या तीन वाट्या
6. हिरव्या मिरच्या 2-3
7. जिरे
8. आल्याची पेस्ट
9. एक टिस्पून तिखट
10. मीठ,
11. कोथिंबीर
12. तळणीसाठी तूप.

साहित्य 
1. चार मध्यम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे
2. दीड वाटी उपवासाची भाजणी
3. राजगिरा व शिंगाडा पीठ प्रत्येकी एक टिस्पून
4. दाण्याचे कूट एक वाटी
5. दही मोठ्या तीन वाट्या
6. हिरव्या मिरच्या 2-3
7. जिरे
8. आल्याची पेस्ट
9. एक टिस्पून तिखट
10. मीठ,
11. कोथिंबीर
12. तळणीसाठी तूप.

कृती 
एका परातीत उकडून साल काढलेले बटाटे, दाण्याचे कूट, सर्व पीठे, तिखट, मीठ घेणे. सर्व पदार्थ एकजीव मळून घेणे. या मिश्रणाचे लाडूच्या आकाराचे गोळे करावेत. कढईत तूप गरम करून हे गोळे लालसर रंगावर तळून घ्यावेत. नंतर एका रुंद तोंडाच्या भांड्यात किंवा पसरट बाऊलमध्ये दही घ्यावे. त्यात मिरची, आल्याची पेस्ट, मीठ घालावे. दही तसेच पाणी न टाकता रवीने घुसळून घ्यावे. त्यात तळलेले गोळे टाकावेत. त्यावरून चिरलेली कोथिंबीर पेरावी तसेच आवडत असेल तर काही वेळ फ्रिजमध्ये ठेवून. नंतर खायला घ्यावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News