उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी आश्वासानाने उपोषण मागे

विनोद आपटे 
Tuesday, 23 July 2019
  • विरोधी बाकावर असलेल्या उपसरपंचासह आकरा ग्राम पंचायत सदस्य हे, सोमवार दि २२ पासून ग्राम पंचायत शेजारी अमराण उपोषणाला सुरूवात
  • उच्च स्तरीय तपासणी करून दोषीवर कारवाई करण्याचे लेखी पञ देऊन गट विकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने उपोषण कर्त्यांना आश्वाशित केल्याने संध्याकाळी सात वाजता अमरण उपोषण मागे

नांदेड: ग्राम पंचायत कडून चौदाव्या वित्त आयोगातून करण्यात आलेली सर्वच विकास कामे ही, भ्रष्टाचाराने बरबटलेली असून प्रत्येक कामात गैरव्हार करून शासनाचे लाखो रूपये हडप केले. यातील सर्व दोषीवर शासनाकडून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करात सत्तेत असलेले व विरोधी बाकावर असलेल्या उपसरपंचासह आकरा ग्राम पंचायत सदस्य हे, सोमवार दि २२ पासून ग्राम पंचायत शेजारी अमराण उपोषणाला सुरूवात केली होती. पण जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्हि. आर. कोंडेकर यांनी आठ दिवसात येथे करण्यात आलेल्या सर्व कामाची उच्च स्तरीय तपासणी करून दोषीवर कारवाई करण्याचे लेखी पञ देऊन गट विकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने उपोषण कर्त्यांना आश्वाशित केल्याने संध्याकाळी सात वाजता अमरण उपोषण मागे घेण्यात आले. 
             
मुखेड तालुक्यातील सर्वात मोठी  मुक्रबाद ग्राम पंचायत आहे. काही वर्षापासून ग्राम पंचायत अनेक कारणाने वादग्रस्त ठरलेली असून तालुक्यात एक चर्चेचा विषय बनलेली आहे. आता तर चक्क सत्तेत असणारे व विरोधात असणारे ग्राम पंचायत सदस्य हे, ग्राम पंचायतच्या मनमानी कारभाराला कंठाळून उप सरपंच चांदसाब कुरेशी, खासीम चौधरी, हलिमाबी शेख. भाग्यश्री पंदिलवार, प्रणिता धोंगडे पाच सदस्य तर काशिनाथ इंदूरे, हेंमत खंकरे, अनुसया बोयवार, मनोज जाधव, अंजिता बोधणे, अनिता बोयवार, या विरोधी सदस्यांनी अमराण उपोषणाचे हत्यार उपसून  २०१५- १९ चार वर्षीच्या कालावधीत चौदाव्या वित्त आयोगातून करण्यात आलेली सर्व कामेही दर्जाहीन करून शासनाच्या लाखो रूपये हडप केली आहेत. यात काही कामाच्या बनावट एम, बी. तयार करून शासनास सादर करण्यात आले ही, कामे करत असताना मासिक बैठका, ग्राम सभेत आराखडा सादर न करता तहकूब मासिक बैठकीचे ठराव घेऊन या कामाची मान्यता घेण्यात येत आहे.

कामाचे कार्यारंभ आदेशावर व झालेल्या कामाच्या बिल पावतीसह ग्राम पंचायतच्या सर्वच दस्ताऐवजावर एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असून त्यावर गैरव्यावहार झाल्याच्या नोंदी आहेत. बिले एकाचे नावाने व धनादेश हा दुसऱ्याच्या नावाने देण्यात आले असल्यामुळे उर्वरीत रक्कम ही, पुर्ण चौकशी झाल्या शिवाय देऊ नये. गावातील पाणी पुरवठा योजनेचे एक काम हे, अनेकदा दाखऊन शासनाचे लाखो रूपये हडप केले आहेत. तर गावातील गरीबांना मिळणाऱ्या घरकूल योजनेत लाभार्थ्यांशी आर्थिक व्यव्हार होत नाही. तोपर्यंत त्या लाभार्थ्यांचे नाव हे, अॉनलाईन होत नाही. तर शासनाने आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्व कामाची व होत असलेल्या कामाची क्वालीटी कंन्ट्रोल विभागाकडून दर्जा तपासावा व  तालुक्याच्या बाहेरील अनुभवी अधिकाऱ्यांकडून याची उच्च स्तरीय  चौकाशी करावी. अशी मागणी या ग्राम पंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे करून बेमुद्दत अमरण उपोषणाला सुरूवात केली होती. 

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी उपोषणाचे गांभीर्य ओळखत मुक्रमाबाद येथील चौदाव्या वित्त आयोगातून व इतर योजनेतून झालेल्या सर्वच कामाची दोन सदस्यीय समिती गठीत करून आठ दिवसात चौकशी करून यातील दोषीवर कारवाई करण्याचे लेखी पञ देऊन महेश पाटील, विस्तार अधिकारी मुखेड यांना देऊन उपोषण ठिकाणी पाठऊन दिल्याने अमरण उपोषण कर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांचे आठ दिवसात दोषीवर कारवाई करण्याचे लेखी पञ घेऊन आपले आमरण उपोषण मागे घेतले. यावेळी मेहेश पाटील विस्तार अधिकारी, पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, यांनी सर्व उपोषण कर्त्यांना शरबत पाजून उपोषण सोडविला. तर महादेव जळकोटे, रणजित मुद्दीराज, ईबितदार, जमादार चित्ते यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News