फॅशनचं अभिनव दालन; विद्यार्थीनींचे ‘वेस्टपासून बेस्ट’

विवेक मेतकर
Wednesday, 19 June 2019

आजकाल प्रतिभेला, व्यक्तिमत्त्वाला उठाव देणारे, शोभेल असे फॅशनेबल दागिने वापरणे, त्यासंदर्भातील स्टाइल आयकॉन बनण्याच्या इच्छेमुळेही दागिने खरेदीत वाढ झाली आहे. त्यामुळेच फॅशनेबल, ऑकेजनल, कॉस्च्युम ज्वेलरीला मागणी वाढते आहे.

अकोला ः बदलती लाईफस्टाईल हा तसा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न... त्यातूनच निर्माण होती ती फॅशन. एकदा फॅशन आली की ती झटपट लोकप्रिय सुध्दा होते. म्हणूनच आज फॅशनची मोठी क्रेझ तरूणाईमध्ये दिसून येते. मात्र, बरेचदा ही फॅशन सर्वसामान्यांना परवडणारी नसतेच. परंतु, अकोल्यातील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थीनींनी त्यांच्या निदेशकांच्या मार्गदर्शनात ‘वेस्टपासून बेस्ट’ बनविण्याचा अभिनव उपक्रम राबविला. फॅशनच्या नव्या संकल्पनाच यानिमित्ताने पुढे आल्या. बुधवारी (ता.१९) सकाळी ११.३० ते ६.३० या वेळात त्या वस्तूंचे प्रदर्शन संस्थेत आयोजित करण्यात आले आहे.

आजकाल प्रतिभेला, व्यक्तिमत्त्वाला उठाव देणारे, शोभेल असे फॅशनेबल दागिने वापरणे, त्यासंदर्भातील स्टाइल आयकॉन बनण्याच्या इच्छेमुळेही दागिने खरेदीत वाढ झाली आहे. त्यामुळेच फॅशनेबल, ऑकेजनल, कॉस्च्युम ज्वेलरीला मागणी वाढते आहे. पर्यायाने ज्वेलरी डिझायनरलाही. पूर्वीच्या काळी विशिष्ट वर्गापुरती मर्यादित असलेली ज्वेलरी डिझायनिंगची ही कला. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे वारसारूपाने या कलेचा प्रवास होत असे. याबाबतीतले बारकावे, टिप्स हे अक्षरश: एक गुपितच असायचे. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमातून तांत्रिकदृष्ट्या उच्च प्रशिक्षितांनी या क्षेत्रात प्रवेश केला आणि प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली. पारंपरिक कलेला व्यावसायिकतेचे रूप मिळाल्यामुळे या कलेने अनेकांना कल्पक करिअरचं प्रवेशद्वारं यानिमित्ताने उघडलं गेलं आहे.

टाकावू पासून टिकाऊ
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मुलींना त्यांच्या अभ्यासक्रमातील व्यवसायामध्ये विविध प्रकारचे डिझाईन करून तयार केलेल्या गारमेंटला अनुसरून विविध ॲक्सेसरीज तयार करण्याचे सुध्दा प्रशिक्षण देण्यात येते. ॲक्सेसरीजमध्ये विविध प्रकारचे स्कार्फ, बेल्ट, फुटवेअर, पर्स, मोबाईल व लॅपटॉप कव्हर, होम फर्निशिंग (पिलो कवर, पडदे) विविध प्रकारची ज्वेलरी, ब्रेसलेट , इअर रिंग्ज, नेकलेस इत्यादीचा समावेश आहे. विद्यार्थीनींनी यातील बऱ्याचशा वस्तू टाकाऊ मटेरियल पासून तयार केलेल्या असून ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ असा अभिनव उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News