शेतकरीपुत्राने बनवलं चक्क कारपासून हेलिकॉप्टर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019
  • लहानपणी पाहिलेलं स्वप्न मोठेपणी पुर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणान चक्क स्वत:च्या कार पासून हेलिकॉप्टर बनवल आहे.

लहानपणी पाहिलेलं स्वप्न मोठेपणी पुर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणान चक्क स्वत:च्या कार पासून हेलिकॉप्टर बनवल आहे.  बिहार राज्यातील सरण जिल्ह्यात शार्मी गावचा रहिवासी मिथिलेश कुमार प्रसाद असं या तरुणाचं नाव आहे. एका गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या २३ वर्षीय तरुणाने हे दैदिप्यमान कार्य केल आहे.

मिथिलेशने गुजरात येथे पाईपलाईन फिटरचे काम करत पैशांची बचत केली. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्याने एक नॅनो कार विकत घेतली व कार पासून हेलिकॉप्टर बनवण्याच्या प्रयोगाला सुरूवात केली. सात महिन्याच्या प्रदीर्घ कालावधी नंतर मिथिलेशन  कार पासून हेलिकॉप्टर बनवण्यात यश आल आहे. मिथिलेशन बचत केलेली सर्व रक्कम या प्रयोगात खर्च केली आहे. हेलिकॉप्टर तयार करणतांना मिथिलेशचा भाऊ सुजीतने यांनी मदत केली.  

हेलिकॉप्टरची रचना
हेलिकॉप्टरच्या आतला भाग लोखांडापासून तयार केला आला आहे. बाहेरील भागासाठी अॅल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. तसेच टेल रोटर, मुख्य रोटर ब्लेड, टेल बूम, रोटर मास्ट आणि कॉकपिट तयार करण्यात आलं आहे

'हेलिकॉप्टरच्या काही तांत्रिक बाबीवर सध्या काही काम सुरू आहे. काही दिवसात हे काम पुर्ण होईस आणि यशस्वीरित्या हेलिकॉप्टर उड्डाण भरेल' असे मत प्रसारमाध्यमांना व्यक्त केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News