हिंगोलीत दस्त नोंदणीसाठी शेतकऱ्यांचा रात्रीपासून मुक्काम

मंगेश शेवाळकर
Monday, 24 June 2019
  •  हिंगोली येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय मध्ये मागील आठ दिवसापासून इंटरनेट कनेक्टिव्हिटी ची अडचण निर्माण झाल्याने दस्त नोंदणी मध्ये विलंब लागत आहे.
  • रात्रीपासूनच शेतकरी व नागरिक कार्यालयाच्या दारासमोर मुक्कामी थांबत असल्याचे चित्र आहे.

हिंगोली -  हिंगोली येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय मध्ये मागील आठ दिवसापासून इंटरनेट कनेक्टिव्हिटी ची अडचण निर्माण झाल्याने दस्त नोंदणी मध्ये विलंब लागत आहे. त्यामुळे रात्रीपासूनच शेतकरी व नागरिक कार्यालयाच्या दारासमोर मुक्कामी थांबत असल्याचे चित्र आहे. सोमवारी(ता.२४) हे चित्र काय होते. शेती, प्लॉट  खरेदी-विक्रीची नोंदणी याशिवाय कर्जासाठी माॅडगेजची नोंदणी या कार्यालयात केली जाते.

दररोज हिंगोली तालुक्यातील तीस पेक्षा अधिक शेतकरी व गावकरी कामासाठी या कार्यालयात येऊ लागले आहेत. मात्र बीएसएनएलची इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्यामुळे कार्यालयाची व्यवहार ठप्प होऊ लागले आहेत. त्यामुळे दिवसभरात केवळ पाच ते सहा दस्त नोंदणी होऊ लागले आहेत. तर इतर गावकऱ्यांना परत जावे लागत आहेत. दुसऱ्या दिवशी लवकर नंबर लागावा यासाठी शेतकरी व गावकऱ्यांनी कार्यालयातच मुक्काम ठोकण्याचा पर्याय सुरू केला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News