काळजावर दगड ठेऊन शेतकऱ्यांची पेरणीला सुरूवात

 विनोद आपटे
Friday, 12 July 2019

नांदेड : पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महीना उलटून गेला, तरीही नांदेड जिल्ह्यात  म्हणावा तसा पेरणीयुक्त पाऊस अद्यापही  झाला नसल्यामुळे  शेतकरी   हताश झाले. बहूतांश तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनही रखडून बसल्या आहेत.

नांदेड : पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महीना उलटून गेला, तरीही नांदेड जिल्ह्यात  म्हणावा तसा पेरणीयुक्त पाऊस अद्यापही  झाला नसल्यामुळे  शेतकरी   हताश झाले. बहूतांश तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनही रखडून बसल्या आहेत.

यावर्षी तरी समाधानकारक पाऊस होईल आपली पेरणी होईल या आशेवर शेतकरी हा महागडे बियाणे घेऊन ठेवले, पण पाऊसच नसल्यामुळे या बियाण्याचे  करायचे काय? घरात ठेऊन उपयोग नाही पेरणी करावे तर पाऊस नाही. पेरणीचे दिवस हातातून जात असल्यामुळे पाऊस पडेल अथवा न पडेल .शेतकरी हा काळजावर दगड ठेऊन  पाऊस येईलच या आशेवर पेरणीला सुरूवात केली आहे.

सतत गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांना पाऊस हुलकावणी देत असल्यामुळे वेळेवर पेरण्या होत नाहीत. बीयाण्यांचा खर्चही निघत नाही. शेतात काही पिकत नाही .पिकलेच तर त्या मालाला चांगला बाजारभाव मिळत नाही. शासन व सरकार हे, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी फक्त कागदोपञीच कामे करत असल्याचे दाखवत आहेत. प्रत्यक्षात माञ  शेतीच्या नावावर शेतकऱ्यांच्या आयुष्याची माती होत असते. त्यात पाऊसही वेळेवर होत नाही. मग शेतकर्यांनी  जगायचे की, मरायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांना आज पडलेला आहे.

तर शेतकऱ्यांच्या शेतीसाठी  तालुक्यात कुठेही पाण्याची व्यवस्था नाही. तालुक्यातील एकमेव आंतर राज्यीय  लेंडी प्रकल्प हाही राजकीय कुरघोडीत तब्बल ३४ वर्षांपासून रखडलेला आहे. मग अशा भयाण व दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशी साधणार? हवामान खात्याकडून यावर्षी  चांगला दमदार पाऊस होणार असे  सांगण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी दुष्काळ आपली पाठ सोडणार असे कुठेतरी  शेतकर्यांना वाटत होते. पण यावर्षीही पावसाने हुलकावणी  दिल्यामुळे दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाचविलाच पुंजलेला दिसून येत आहे.

तर आज पेरणीयुक्त पाऊस  आद्यापही झालेला नाही. तरीही आता  शेतकऱ्यांची  पेरणीसाठी लगबग सुरू झाली असून एका एकर साठी बियाणे, खते, मजूरी  मिळून  सतरा हजार रूपये खर्च येतो. पण पाऊसच नाही, यामुळे शेतकरी धास्तावलेला असून मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

जोरदार पाऊस होईल या आशेवर काही शेतकऱ्यांनी हलक्या पावसावरच जूनच्या पहिल्या आठवड्यातच आपल्या पेरण्या उरकून घेतल्या पण तेव्हापासून आतापर्यंत मोठा पाऊस झाला नसल्यामुळे या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट उभा टाकले आहे. तर सततच्या वा-यामुळे व तिव्र उन्हामुळे जमिनीत असलेली  थोडीफार ओलही नाहीशी होत चाललेली आहे. तर  चार दिवसात मोठा पाऊस झाला नाहीतर सुरूवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहील.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News