औरंगाबादेत शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा 

आकाश गायकवाड़, जालना
Tuesday, 10 September 2019
  • १६ तारखेला विभागीय आयुक्त कार्यालयावर धड़कणार मोर्चा
  • मराठवाड्यातील शेतकरी संघटनानी एकत्र येत शेतकरी आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे.

जालना : शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा झाला पाहिजे. पिककर्ज मिळावे, पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी मराठवाड्यातील शेतकरी संघटनानी एकत्र येत शेतकरी आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. १६ सप्टेंबर रोजी आयोजित मोर्चाची सुरवात क्रांती चौक येथून होणार असून विभागीय कार्यालय येथे समारोप होणार आहे. सदरील मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार संघटना, रघुनाथ दादा यांची शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी सह विविध विद्यार्थी संघटना सहभागी होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेक्षाध्यक्ष पूजा मोरे यांनी सांगितले.

मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, औरंगाबादसह सोलापूर आणि नगर येथील शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहे. सोमवारी (ता. ९) जालना येथील शासकीय विश्रामगृह येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाड़ा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, डॉ. नारायण बोराडे यांच्यासह प्रहार संघटना, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

महाजानदेश यात्रेदरम्यान मुखमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे 
जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रे दरम्यान स्वाभिमानीच्या पूजा मोरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवत विरोध केला होता. दरम्यान पोलिसांनी पूजा मोरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यावर दडपशाही केली होती. याघटनेचा निषेध मोर्चात करणार असल्याचे कळविण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News