दिवंगत मुंडेच्या प्रेरणेमुळेच शेतकरी हित: ओमप्रकाश शेटे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 23 June 2019
  • दुष्काळाने पिचलेल्या बळीराजासाठी देवदुत धावला
  • ओमप्रकाश शेटेंकडून कपाशीच्या दहा हजार पिशव्यांचे वाटप

बीड: शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम राबलेल्या दिवंगत गोपिनाथ मुंडे यांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवत आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी झटत आहोत. आपण कुठलेही राजकारण करत नसुन महाराष्ट्र भर मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाच्या माध्यमातून केलेल्या जनसेवेमुळे बळीराजासाठी काहितरी करावे या उद्देशाने हा बीज वाटपाचा उपक्रम केल्याचे त्यांनी सांगितले. बळीराजा टिकला तर देश टिकेल दुष्काळी परिस्थितीत खचलेल्या शेतकऱ्याला छोटीशी मदत म्हणून हे कार्य हाती घेतल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले. हा बियाणे वाटपाचा कार्यक्रम दिवंगत गोपीनाथराव मुंडेंना समर्पित करत असल्याचेही ओमप्रकाश शेटे म्हणाले.

मागच्या वर्षी दुष्काळाच्या झळांनी पिचलेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसांत झालेल्या मध्यम पावसाने दिलासा दिलेलाच आहे. पण, त्यांच्या मदतीला ओमप्रकाश शेटे नावाचा देवदुतही धावून आला आहे. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या पुढाकारातून रविवारी (ता. २३) माजलगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना माझगाव डॉकशिप बिल्डर्स प्रा. लि.च्या माध्यमातून अजित सिड्सच्या दहा हजार कपाशी बॅगचे वाटप करण्यात आले.

आदर्श ग्राम समिती महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, मल्हार मार्तंड देवस्थान जेजुरीचे अध्यक्ष राजकुमार लोढा, राहुल लोणीकर, माझगांव डॉकचे अध्यक्ष संजय काजवे, संचालक विनोद मेहता उपस्थित होते. रविवारी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील २३ चारा छावण्यांतील पाच हजार शेतकऱ्यांना अजित १९९ वाणाच्या कपाशी बियाणांच्या दहा हजार बॅगांचे वाटप करण्यात आला. 

वडवणी येथे प्रातिनिधीक स्वरुपात हा कार्यक्रम पार पडल्यानंतर चारा छावण्यांत जाऊन बियाणे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांचे मानबिंदू बळीराजाच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. सुत्रसंचालन बंडु खांडेकर तर आभार सरपंच हरी पवार यांनी मानले. यावेळी पोपटराव पवार, राजकुमार लोढा, राहुल लोणीकर,  यांची भाषणे झाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News