फरहान अख्तर पुन्हा एकदा चर्चेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

फरहान त्याची कथित गर्लफ्रेन्ड शिबानी दांडेकरबरोबर सुट्ट्या एन्जॉय करून आल्यानंतर थेट कामाला लागला आहे. यावर्षी त्याच्या हाती ‘स्काय इज पिंक’ हा चित्रपट आहे.

फरहान अख्तर त्याच्या खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो.

फरहान त्याची कथित गर्लफ्रेन्ड शिबानी दांडेकरबरोबर सुट्ट्या एन्जॉय करून आल्यानंतर थेट कामाला लागला आहे. यावर्षी त्याच्या हाती ‘स्काय इज पिंक’ हा चित्रपट आहे. आता आणखी एका हिंदी चित्रपटासाठी फरहानची निवड करण्यात आली आहे. ‘तूफान’ या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटासाठी तो सध्या जिममध्ये घाम गाळत आहे. फरहानने सोशल मीडिया अकाऊंटवरून जिममधील फोटो शेअर करत ‘तूफान’ चित्रपटाची तयारी सुरू असे म्हटले आहे. फरहानने गायक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी चोखपणे पार पाडल्या. शिवाय त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकांसाठी तो पुरेपूर मेहनतही घेतो.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News