तुझी माझी लवस्टोरी

वपु काळे
Friday, 9 August 2019
  • कुठेही काहीही कमी नसताना माणसं दु:खी दिसतात ते यामुऴे... उत्कट प्रेम करणारी व्यक्ती त्यांना आयूष्यात भेटतच नाही... यदा कदाचित भेटली तरी त्या प्रेमाला कधीही प्रतिष्ठा मिऴत नाही... 

प्रेमाची खरी व्याख्या कुणाला समजलीय! अरे प्रेम म्हणजे महापूर असतो महापूर... असं झूळझूळ वाहणारं एखाद पाणी… येतंय येत नाही… येतंय येत नाही... प्रेम म्हणजे वादळ आहे… प्रेम म्हणजे महापूर आहे… पण समाज आणि प्रेमाची ही संकल्पना यात हे जे अंतर पडलंय, त्याचे कारण माहीत आहे? प्रेमाचा स्वीकार करताना देखिल ते जर तुमच्या रुढ चाकोरीतून मान्यवर नात्यातूनच आलं तर त्याला तूम्ही प्रेम म्हणणार...

मग ते गढूळ असलं तरी तुमच्या हिशेबी ते पवित्र, त्यात झेप नसली, उत्कटता नसली, तरी त्याला तुम्ही कवटाऴणार... त्यात तेज नसलं तरी तुम्ही दिपून जाणार... अरे त्या प्रेमात पेटवून टाकण्याची ताकद नसली तरी तुम्ही जऴून स्वत:ची राख होउन देणार का? कारण ते चाकोरीतुन येतं... तुमच्या नीती अनीतीच्या कल्पनांची बूज संभाळत येतं... बस तुमच्या सारख्यांना तेवढंच प्रेम समजतं... समाजालाही तेवढंच प्रेम कऴतं... बाकीच्या प्रेमाला मग समाज काय म्हणणार... कुठेही काहीही कमी नसताना माणसं दु:खी दिसतात ते यामुऴे... उत्कट प्रेम करणारी व्यक्ती त्यांना आयूष्यात भेटतच नाही... यदा कदाचित भेटली तरी त्या प्रेमाला कधीही प्रतिष्ठा मिऴत नाही... आणि तरीही समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला असं एखादं प्रेमाचं स्थान हवंच असतं... 

काय कारण असेल? एकच अशा प्रेम भक्ती जिथं उगम पावते तिथं संकेत नसतात... असते फक्त उत्कटता.... तिथे बंधन नसतं... असते फक्त अमर्यादता.. त्यातली दाहकता... पचवायला पोलादी छाती लागते... त्यातून जे नंदनवन फूलतं ते पहायला दोन डोऴे पुरत नाहीत...अरे डोऴे पाहू शकणार नाहीत असं दाखवणारं निराऴं इन्द्रियं लागतं... सामान्यांच्या वाटणीला हे प्रेम यायचं नाही... निभावण्याची ताकद असणाऱ्या माणसांचाच तो प्रांत आहे... आणि प्रेमाच्या प्रांतात अशी उत्कटतेने उडी घ्याल... मागचा पुढचा विचार न करताना धाव घ्याल तेव्हाच तुम्हाला भक्ती म्हणजे काय ते समजेल…

 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News