भन्नाट शक्कल... चोरीनंतर तो असेही करायचा !

मनोज साखरे 
Wednesday, 17 July 2019

औरंगाबाद: चोरी करायचे मनात ठरवले तर तो पायीच निघायचा. चालता- चालताच कुणाच्याही घराजवळ दोरीवर वाळत घातलेला शर्ट घालायचा अन् चोरी करताच पसार होताना तोच शर्ट काढुन फेकुन द्यायचा. पोलिसांच्या हाती लागु नये, सीसीटीव्हीत कपड्यावरुन ओळख पटु नये म्हणून तो अफलातून प्रकार करायचा. याच मोडसवर त्याने आतापर्यंत आठवेळा चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

औरंगाबाद: चोरी करायचे मनात ठरवले तर तो पायीच निघायचा. चालता- चालताच कुणाच्याही घराजवळ दोरीवर वाळत घातलेला शर्ट घालायचा अन् चोरी करताच पसार होताना तोच शर्ट काढुन फेकुन द्यायचा. पोलिसांच्या हाती लागु नये, सीसीटीव्हीत कपड्यावरुन ओळख पटु नये म्हणून तो अफलातून प्रकार करायचा. याच मोडसवर त्याने आतापर्यंत आठवेळा चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

राजेंद्र सुपडा चंडोल मुळ जनुना (जि. बुलडाणा) असे या संशयित चोराचे नाव आहे. त्याचे जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण, कुटुंबिय शेतीकामात राबत असताना तो शेतीपासून दुरच होता. छोट्या-मोठ्या हॉटेलात काम करायचा. तिथे स्वयंपाक शिकुन घेतला आणि औरंगाबाद येथे हॉटेलात कामाला लागला. दोनवेळा हॉटेलात काम केल्यानंतर ते सोडून दिवसांपुर्वीच पुन्हा गावी गेला.

गंगाजळी संपल्याने तीन वर्षांपुर्वी केलेल्या चोरीची आठवण त्याला आली. तीच शक्कल पुन्हा लढविली. झटपट पैसा मिळवायचा, श्रीमंत व्हायचे या आसक्तीतून तो अकरा जुलैला रात्री औरंगाबादेत अवतरला. बारा जुलैला हडको भागात त्याने दोन महिलांची दागिने हिसकाविली. सीसीटीव्हीत अडकल्यानंतर पोलिसांनीही त्याला पकडलेच. त्यानंतर चौकशीतून त्याच्या अनेक अजब बाबी समोर आल्या. चोरीवेळी त्याने एका शैक्षणिक क्‍लासेसमधील तरुणाचा शर्ट त्याने घातला होता. हा प्रकार सीसीटीव्हीत आल्यानंतर एका परिचिताने पोलिसांना त्याची माहिती दिली. तो पोलिसांच्या गळाला लागला. त्याच्याकडून पोलिसांनी पाच तोळ्याचे दागिने, चार मोबाईल व दोन दुचाकीही हस्तगत केल्या. 

मलाही पैसेवाला बनायचय! 
पोलिसांनी पकडल्यानंतर त्याला कुक असुनही चोरी का करतो असे विचारल्यानंतर त्याने "माझे अनेक मित्र पैशावाले आहेत. मित्र पैसेवाले म्हणुन मलाही पैसेवाला बनयाचे होते. त्यासाठी मी चोरी केली.'' अशी असमर्थनीय बाबच त्याने पोलिसांनी सांगितली. 

पहिली चोरी तीनवर्षांपुर्वी 
राजेंद्र औरंगाबाद शहरात हॉटेलमध्ये कामाला होता. त्यामुळे हडको-सिडको परिसरातील गल्लीबोळाची त्याला चांगली माहिती आहे. याचाच फायदा घेत त्याने हडको-सिडको भाग टार्गेट केला. त्याच भागातून त्याने पाच ते सहावेळा चोऱ्या केल्या. तीन वर्षांपुर्वी त्याला गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यावेळी पहिल्यांदा त्याने मंगळसुत्र चोरी केली होती. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News